पावसाळा सुरु झाला की, अनेक आरोग्याच्या तक्रारीसह घरातील स्वच्छतेच्या तक्रारी वाढतात.(Monsoon Home Cleaning) पावसाळ्यात घरभर माशा, किडे, कीटक यांचा त्रास तर सहन करावाच लागतो. पण घरातील भिंतींना ओलावा सुटणे, जमिनीवर शेवाळ तयार होणं किंवा ओलाव्यामुळे भिंतींचा रंग निघणं यांसारख्या समस्या वाढतात.(Home remedies for monsoon fungus) यामुळे घराच्या भिंती, जास्त प्रमाणात बाहेरच्या भिंती खराब होऊ लागतात. यामुळे घर घाण दिसते. घराबाहेर शिड्या असतील तर त्या ठिकाणी देखील शेवाळ साचतं.(Home cleaning tips for rainy season) मातीच्या कुंडीला किंवा अंगणात शेवाळमुळे जागा ओलसर आणि चिकट राहते. त्यामुळे पाय घसरुन पडण्याची भीती देखील वाटते. अशावेळी नेमकं काय करावं सुचत नाही. (Damp wall treatment)
सततच्या पावसामुळे आपल्या घराच्या बाहेरील भिंतींना, छप्पर, बाल्कनी रेलिंग, पायऱ्या सर्व काही ओले असते. ओलाव्यामुळे तिथे हिरवे किंवा काळे शेवाळ तयार होऊ लागते.(Slippery floor solutions) यामुळे भिंती, टाइल्सवर डाग पडतात आणि खराब होतात. इतकेच नाही तर आपण घसरुन पडण्याची शक्यता देखील अधिक असते. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास शेवाळ निघून जाण्यास मदत होईल. (Anti-mold home tips)
पावसामुळे लाकडी दरवाजे फुगले, कपाटांना वाळवी लागली? ५ सोपे उपाय, वाळवी होईल गायब
1. टाइल्स आणि भिंतीवरील शेवाळ काढण्यासाठी आपण पांढरे व्हिनेगर वापरु शकतो. व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड असते जे शेवाळ काढण्यास मदत करते. यासाठी व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिक्स करुन स्प्रे तयार करा. शेवाळ असणाऱ्या जागी स्प्रे करुन तासभर ठेवा. ब्रशच्या मदतीने स्क्रब करा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे बाल्कनीच्या भिंती, घराबाहेरील टाइल्स स्वच्छ होतील.
2. बेकिंग सोडा आणि पाण्याच्या द्रावणानेही शेवाळ काढता येईल. यात असणारे अँटीफंगल गुणधर्मांमुळे शेवाळ निघून जाईल. थोड्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळून जाड पेस्ट बनवा. जिथे शेवाळ असेल तिथे लावा. ३० मिनिटे राहू द्या. नंतर ब्रश किंवा स्पंजने घालून घ्या आणि पाण्याने धुवा.
पितळी समया-निरांजनवर काळेकुट्ट मेणचट थर? ४ सोप्या टिप्स-न घासताच दिवे उजळतील लख्ख
3. लिंबाच्या रसात मीठ मिसळून त्यावर लावून शेवाळ स्वच्छ करु शकता. लिंबूमध्ये नैसर्गिक आम्ल असते. जे साचलेले शेवाळ सहजपणे काढून टाकते. लिंबाच्या फोडीवर मीठ लावून शेवाळ असणार्या जागी घासा. १५ मिनिटांनी स्क्रब आणि ब्रशने घासून घ्या. नंतर पाण्याने स्वच्छ करा.