Join us
Daily Top 2Weekly Top 5

तापमान वाढताच घरात पालींचा सुळसुळाट? लगेच करा 'हे' घरगुती उपाय, पाली पुन्हा घरात दिसणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:45 IST

How to remove lizards from Home : बरेच लोक केमिकल स्प्रे चा वापर करतात किंवा बाजारातील प्रॉडक्ट्सचा वापर करतात. हे प्रॉडक्ट्स महागडे तर असतातच, सोबतच आरोग्यासाठी घातकही असतात.

How to remove lizards from Home:  हिवाळा जाऊन उन्हाळा सुरू झालाय. तापमान वाढलं की घरात कीटक आणि डासांसोबतच पाली येण्यास सुरूवात होते. घरातील भिंतींवर धावणाऱ्या पाली बघून लहान मुलांसोबत घरातील मोठेही घाबरतात. किचन, बेडरूम, हॉल, बाथरूम सगळीकडे पाली थैमान घालतात. खासकरून किचनमधील लाइटजवळ पाली अधिक असतात, कारण तिथे छोटे छोटे कीटक येतात. 

सामान्यपणे पाली मनु्ष्यांना काही नुकसान पोहोचवत नाहीत. पण त्या घरात असणं भितीदायक आणि अस्वस्थ करणारं असतं. अशात बरेच लोक केमिकल स्प्रे चा वापर करतात किंवा बाजारातील प्रॉडक्ट्सचा वापर करतात. हे प्रॉडक्ट्स महागडे तर असतातच, सोबतच आरोग्यासाठी घातकही असतात. चांगली बाब ही आहे की, काही सोपे आणि घरगुती उपाय करून देखील घरातील पाली पळवून लावता येतात. तेच उपाय पाहूयात. 

कॉफी आणि तंबाखू 

पालींना कॉफीचा डार्क गंध आवडत नाही. त्यामुळे कॉफी पावडर आणि तंबाखू मिक्स करून छोट्या छोट्या गोळ्या तयार करा. या गोळ्या जिथे पाल जास्त येते त्याजागी ठेवा. या दोन्ही गोष्टींच्या वासाने पाली त्या जागेवर येत नाहीत आणि हळूहळू घरातून पळून जातात.  

लसूण आणि कांदा  

लसूण आणि कांद्याच्या वासानेही पाली घरात येत नाहीत. आपण किचन, खिड्या आणि दरवाज्याजवळ लसणाच्या कळ्या ठेवू शकता. त्याशिवाय लसणाचा रस पाण्यात मिक्स करून स्प्रे सारखाही वापर करू शकता.

काळ्या मिरीचा स्प्रे

लसणाप्रमाणेच आपण काळी मिरीपासून तयार स्प्रे देखील वापरू शकता. या उपायही पालींना पळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण याचा तिखट वास पालींना पळवतो. 

घर स्वच्छ ठेवा

वरील उपायांसोबत हेही लक्षात घेतलं पाहिजे की, पाली अशा ठिकाणी जास्त येतात जिथे कीटक जास्त असतात. त्यामुळे घर स्वच्छ ठेवा. रात्री किचनचे लाइट बंद करा, अन्न उघडं ठेवू नका आणि खिडक्याही नियमित स्वच्छ करा. असं केल्याने पाली घरात येणार नाहीत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Get rid of lizards at home with these simple tricks.

Web Summary : As temperatures rise, lizards invade homes. Coffee, garlic, pepper sprays, and keeping a clean house effectively repel lizards without harmful chemicals. These simple home remedies will help eliminate lizards.
टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी