Lokmat Sakhi >Social Viral > पावसात भिजल्याने हेल्मेटला येतो कुबट वास? ४ टिप्स-दुर्गंधी गायब आणि हेल्मेटही होईल स्वच्छ कोरडे...

पावसात भिजल्याने हेल्मेटला येतो कुबट वास? ४ टिप्स-दुर्गंधी गायब आणि हेल्मेटही होईल स्वच्छ कोरडे...

how to remove helmet smell dutring rainy season : Tricks To Get Rid Of Smelly Helmet Due To Moisture & Sweat : smelly helmet solution : helmet cleaning tips : home remedies for helmet smell : पावसाळ्यात हेल्मेट भिजून येणारी कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 19:50 IST2025-07-29T19:45:00+5:302025-07-29T19:50:01+5:30

how to remove helmet smell dutring rainy season : Tricks To Get Rid Of Smelly Helmet Due To Moisture & Sweat : smelly helmet solution : helmet cleaning tips : home remedies for helmet smell : पावसाळ्यात हेल्मेट भिजून येणारी कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय...

how to remove helmet smell dutring rainy season Tricks To Get Rid Of Smelly Helmet Due To Moisture & Sweat smelly helmet solution helmet cleaning tips home remedies for helmet smell | पावसात भिजल्याने हेल्मेटला येतो कुबट वास? ४ टिप्स-दुर्गंधी गायब आणि हेल्मेटही होईल स्वच्छ कोरडे...

पावसात भिजल्याने हेल्मेटला येतो कुबट वास? ४ टिप्स-दुर्गंधी गायब आणि हेल्मेटही होईल स्वच्छ कोरडे...

पावसाळा सुरु झाला की अनेक लहान - मोठ्या समस्या त्रास देतात. यापैकीच सगळ्यात कॉमन समस्या म्हणजे हेल्मेट मधून येणारी कुबट - घाणेरडी दुर्गंधी. टू - व्हीलर चालवायची (how to remove helmet smell dutring rainy season) म्हटलं की, हेल्मेट वापरणे सक्तीचे असते. पावसाळ्यात शक्यतो ( Tricks To Get Rid Of Smelly Helmet Due To Moisture & Sweat) पावसाच्या पाण्याने हेल्मेट भिजतेच, आणि आपण हे भिजलेले (smelly helmet solution) हेल्मेट व्यवस्थित न वाळवता तसेच गाडीच्या डिक्कीत ठेवून देतो. यामुळे हे हेल्मेट (helmet cleaning tips) न वाळल्याने त्याला कुबट - घाणेरडी दुर्गंधी येऊ लागते. असे कुबट - घाणेरडी दुर्गंधी येणारे हेल्मेट डोक्यांत घालायला नकोसे वाटते. याचबरोबर, त्याला येणारी दुर्गंधी तर त्याहूनही नकोशी वाटणारी असते(home remedies for helmet smell).

सतत पावसात भिजल्याने किंवा दमट हवामानामुळे हेल्मेटच्या आतमध्ये ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि एक प्रकारचा कुबट वास येऊ लागतो. हा वास फक्त  त्रासदायकच नाही, तर आरोग्यासाठीही चांगला नाही. अनेकदा या वासामुळे डोकेदुखी, त्वचा व केसांशी संबंधित समस्याही सतावू शकतात. अशा परिस्थितीत, काही सोप्या आणि घरगुती उपायांनी आपण हेल्मेटमधून येणारी ही कुबट दुर्गंधी दूर करू शकतो. पावसाळ्यात हेल्मेट भिजून येणारी कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी नेमके काय उपाय करायचे ते पाहूयात.. 

हेल्मेट मधून येणारी कुबट दुर्गंधी कमी करण्याचे सोपे उपाय... 

१. वृत्तपत्र :- हेल्मेटमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी आपण वृत्तपत्राचा वापर करू शकता. हा एक सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय आहे. वृत्तपत्र ओलावा शोषून घेतं, ज्यामुळे हेल्मेट आतून लवकर कोरडं होतं आणि त्यामुळे येणारी कुबट दुर्गंधी कमी होते. दररोज वापरल्यानंतर हेल्मेटमध्ये एखाद कोरडं वृत्तपत्र ठेवल्यास, वास आणि बॅक्टेरियाही दूर राहतात.

२. बेकिंग सोडा :- हेल्मेटमधून येणारी कुबट दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा एक उत्तम पर्याय आहे. बेकिंग सोडा वास - शोषक (odor absorber) मानला जातो आणि दुर्गंधी निर्माण करणारे कण शोषून घेतो. अर्धा कप बेकिंग सोडा एका छोट्या कापडी पिशवीत भरून घ्या आणि ती हेल्मेटमध्ये ठेवून द्या. काही तास किंवा रात्रभर ठेवल्यास, हेल्मेटमधील वास मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि हेल्मेट पुन्हा वापरण्यासाठी एकदम फ्रेश असते. 

पावसाळ्यात होणारी केसगळती थांबवणारं जादुई तेल! एरंडेल तेलात मिसळा २ पदार्थ - केस व स्काल्प राहील निरोगी...

३. कॉफी पावडर :- आपण बेकिंग सोड्याप्रमाणेच कॉफी पावडरचा देखील वापर करु शकता. यासाठी, एका छोट्या कापडात चमचाभर कॉफी पावडर गुंडाळून ती कॉफी पावडरची पोटली काही तासांसाठी हेल्मेटमध्ये ठेवून द्यावी. बेकिंग सोड्या प्रमाणेच कॉफी पावडर देखील वास - शोषक असल्याने कॉफी पावडर कुबट दुर्गंधी शोषून घेते आणि हेल्मेटमधील कुबट दुर्गंधी कमी करण्यास मदत करते. 

लेकीसाठी सोडली वैद्यकीय प्रॅक्टिस! दिव्या देशमुखच्या आईचाही मुलीसाठी मोठा निर्णय, दिली खंंबीर साथ...

४. हेल्मेट व्यवस्थित सुकवून घ्या :- पावसाच्या पाण्यामुळे किंवा घामामुळे हेल्मेटच्या आतल्या पॅडिंगमध्ये ओलावा साचतो. या ओलाव्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळे हेल्मेटमधून कुबट वास येऊ लागतो. त्यामुळे हेल्मेट स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडे ठेवणे खूप महत्त्वाचे असते. हेल्मेट एकदम उघड्या आणि हवेशीर ठिकाणी उलटे ठेवावे, म्हणजे आतला ओलावा सहजपणे वाळतो. आपण हेल्मेट उन्हातही ठेवू शकता किंवा फॅनखाली देखील वाळवू शकता. यामुळे हेल्मेटमधून कुबट वास येत नाही. याचबरोबर, हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्यात एक पातळीशी टोपी घालावी जेणेकरून, घाम किंवा पाण्याचा थेट आपली त्वचा व केसांशी संपर्क येत नाही.

Web Title: how to remove helmet smell dutring rainy season Tricks To Get Rid Of Smelly Helmet Due To Moisture & Sweat smelly helmet solution helmet cleaning tips home remedies for helmet smell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.