Join us

पावसात बॅग भिजून येतो कुबट दुर्गंध? ३ ट्रिक्स, ५ मिनिटांत घाणेरडा वास होईल गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2025 10:05 IST

How To Remove Bad Smell From Your Office Bag During Monsoon : How to Remove Smell From Bag : Keep Away the Musty Monsoon Smell From Your Office Bag : बॅग ओलसर राहून त्यातून कुबट दुर्गंधी येऊ नये म्हणून नेमके काय घरगुती उपाय करावेत ते पाहा...

अनेकदा पावसाळ्यात छत्री विसरल्यावर आपल्याला पावसात भिजण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. छत्री, रेनकोट नसला की आपल्याला नाईलाजास्तव पावसात भिजावे लागते. पावसात आपण (How To Remove Bad Smell From Your Office Bag During Monsoon) भिजलो म्हणजे आपल्यासोबतच आपली बॅग देखील पाण्यात भिजते. पावसात भिजलेली बॅग आपण घरी आल्यावर ती संपूर्णपणे न वळवता आहे तशीच ठेवून देतो. यामुळे ही बॅग व्यवस्थित न सुकल्यामुळे त्या बॅगेतून कुबट दुर्गंधी येऊ लागते(Keep Away the Musty Monsoon Smell From Your Office Bag).

बॅग उघडताच किंवा हातात घेताच त्यातून घाणेरडी कुबट दुर्गंधी येते. अशावेळी ही बॅग ओलसर राहून खराब होण्याची देखील शक्यता असते. यामुळे पावसात भिजलेल्या बॅगेला व्यवस्थित सुकवणे (How to Remove Smell From Bag) देखील गरजेचे असते. पावसाळ्यात असा प्रसंग अनेकदा येतोच, अशा परिस्थितीत बॅग ओलसर राहून त्यातून कुबट दुर्गंधी येऊ नये म्हणून नेमके काय घरगुती उपाय करावेत ते पाहूयात. 

बॅगेतील कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी करा सोपे उपाय... 

१. कॉफी पावडर :- एका छोट्या सुती कापडात किंवा जुन्या मोज्यात १ ते २ चमचे कॉफी पावडर घाला आणि घट्ट बांधून एक पोटली तयार करा. ही पोटली रात्रभर किंवा तासभर बॅगेच्या आत ठेवा. कॉफीचा तीव्र सुगंध आणि वास शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता बॅगेतील कुबट वास पूर्णपणे नाहीसा करून टाकण्यास मदत करते. कॉफी हे एक नैसर्गिक डिओडोरायझर आहे, जे वास निर्माण करणारे कण शोषून घेते आणि कुबट दुर्गंधी घालावेत. 

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

२. लिंबाच्या साली :- लिंबाची ताज सालं बॅगेतील कुबट वास दूर करू शकते. लिंबू हे एक नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक आहे. यासाठी काही ताज्या लिंबाच्या साली घ्या आणि त्या बॅगेच्या आत पसरवून ठेवा. बॅग काही तास किंवा रात्रभर खुली ठेवावी, जेणेकरून आत हवा खेळती राहील. तुम्ही १ ते २ लिंबाचे काप कायम बॅगेत देखील ठेवू शकता, पण ते खूप वेळ ठेवू नयेत, अन्यथा ओलसरपणा वाढू शकतो.लिंबाच्या सालींमध्ये असणारे सिट्रिक अ‍ॅसिड आणि नैसर्गिक तेल बॅगमधील कुबट वास शोषून घेतात. 

टाचांना मोठ्या भेगा पडल्या-पावसाळ्यात ठणकतातही? कच्च्या बटाट्याचा उपाय- भेगांसाठी खास मलम...

३. बॅग उन्हात आणि हवेत सुकवा :- आपण बॅग उन्हात आणि हवेत सुकवू शकतो. सर्वप्रथम, बॅगेतील सर्व सामान बाहेर काढा. बॅग पूर्णपणे उघडा, तिच्या सगळ्या चैन आणि पॉकेट्स मोकळे करा. त्यानंतर ती थेट सूर्यप्रकाश असलेल्या जागेत आणि मोकळ्या हवेत ठेवा. शक्य असल्यास बॅग लटकवा, जेणेकरून हवा तिच्या आरपार जाऊ शकेल.किमान काही तास तरी बॅग उन्हात ठेवा, किंवा जोपर्यंत ती पूर्णपणे सुकत नाही आणि कुबट वास नाहीसा होत नाही, तोपर्यंत. खरंतर, सूर्य प्रकाशामुळे वास निर्माण करणारे बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट होते.

टॅग्स :सोशल व्हायरलमोसमी पाऊसपाऊसहोम रेमेडी