आता आपलं घर कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंनी भरलेलं असतं. बऱ्याचदा आपल्या इतर कामांच्या गडबडीत कधीतरी घराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं आणि मग कधीतरी घरातल्या काही भागात दुर्गंधी यायला लागते. स्वयंपाक घरातलं सिंक, बेसिन, वॉशरूम यांच्यातून कधी कधी घाण वास येतो. बूटांच्या कपाटातून कुबट वास येतो तर कधी ठेवणीतल्या कपड्यांचा कुबट वास येऊ लागतो. बऱ्याचदा तर फ्रिजमधूनही दुर्गंधी येत असते (home hacks to remove odour from house). आता असं काही झालं तर या वस्तूंमधून येणारा घाण वास कसा कमी करायचा (simple tips for odour free house) आणि रुम फ्रेशनर न वापरताही घर कसं सुगंधित ठेवायचं ते पाहूया...(how to remove bad smell from home?)
घरातून येणारी दुर्गंधी कशी कमी करावी?
१. जर सिंकमधून किंवा बेसिनमधून घाण वास येत असेल तर १ कप व्हिनेगर घ्या. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला. आता हे मिश्रण घाण वास येणाऱ्या सिंक किंवा बेसिनमध्ये ओता. त्यानंतर पुढच्या ५ ते ७ मिनिटांनी त्यावर उकळतं पाणी ओता. सिंकमधून येणारी दुर्गंधी पुर्णपणे गेलेली असेल. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास सिंक किंवा बेसिनमधून दुर्गंधी येणार नाही.
किचन सिंकमधून कुबट वास येतो? १० मिनिटांचा सोपा उपाय- सिंकमधून कधीच दुर्गंधी येणार नाही
२. बुटांमधून किंवा शू रॅकमधून घाण वास येत असेल तर पिळून घेतलेल्या लिंबाच्या साली त्यामध्ये ४ ते ५ तास ठेवा. लिंबू वास शोषून घेईल. त्याचप्रमाणे एक बटाटा मधोमध चिरा. त्यावर थोडा बेकिंग सोडा टाका आणि बटाट्याचे दोन्ही तुकडे शु रॅकमध्ये किंवा वास येणाऱ्या बुटामध्ये ठेवा. दुर्गंधी कमी होईल.
३. सोफ्यामधून कुबट वास येत असेल तर त्यावर थोडा बेकिंग सोडा घालून ठेवा. त्यानंतर १० मिनिटांनी व्हॅक्यूम क्लिनर फिरवून सोफा स्वच्छ करून घ्या. सोफ्याच्या कपड्यातून येणारा घाण वास जाईल.
केस भराभर वाढण्यासाठी रामबाण उपाय- रोज १ चमचा 'ही' पावडर खा, गुडघ्यापर्यंत लांब होतील केस
४. वापरात नसलेल्या ठेवणीच्या कपड्यांनाही अनेकदा कुबट वास येतो. लाकडी दिवाणच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या कपड्यांनाही मातकट वास येतो. तो घालविण्यासाठी त्यामध्ये कापुराच्या वड्या, डांबर गोळ्या, धूप किंवा उदबत्त्यांची रिकामी पाकिटं टाकून ठेवा. बॉक्स नेहमीच सुगंधित राहील.
