Join us

वीज कडाडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, 'अशी' घ्या काळजी - अपघात टळेल धोका होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 12:43 IST

What are 5 things you should avoid doing in a lightning storm : How To Protect Yourself, Or Avoid Getting Hit By Lightning During a Thunderstorm : 5 things to do to protect yourself from lightning : 5 things that should be avoided during a thunderstorm : 5 Tips for Thunderstorm Safety : Five Ways to Minimise the Risk of Being Struck by Lightning During Rainy Season : वीज कडाडत असताना सुरक्षित राहण्यासाठी व आपला जीव वाचवण्यासाठी नेमकी कोणती खबरदारी घ्यावी....

सध्या सगळीकडेच पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. पावसाळा हा ऋतू आपल्याला जितका सुखद व आनंददायी वाटतो तितकाच तो अधिक त्रासदायक देखील वाटतो. काहीवेळा (What are 5 things you should avoid doing in a lightning storm) हा पाऊस इतका जोरदार आणि मुसळधार पडतो की अनेकांना त्याचा त्रास भोगावा लागतो. कधी कधी तर हा पाऊस विजांच्या कडकडाटासह कोसळून अक्षरश थैमान घालतो. पावसाळ्यात वीज कडाडणे (How To Protect Yourself, Or Avoid Getting Hit By Lightning During a Thunderstorm) ही एक नैसर्गिक पण धोकादायक (5 things to do to protect yourself from lightning) घटना असते. अशा वेळी सुरक्षित राहण्यासाठी काही विशेष काळजी घेणे (5 Tips for Thunderstorm Safety) अत्यंत आवश्यक असते. वीज कडाडताना थेट घराबाहेर फिरणे, मोबाईल वापरणे किंवा धातूच्या वस्तूंना हात लावणे धोकादायक ठरू शकते. अनेकदा अशा काळात असावधानता जीवघेणी ठरू शकते( Five Ways to Minimise the Risk of Being Struck by Lightning During Rainy Season).

पावसाळ्यात गडगडाटासह विजा कडाडल्यावर जर योग्य काळजी घेतली नाही तर अपघात होण्याची भीती निर्माण होते. वीज कडाडल्यावर अनेक वेळा आपल्याला काय करावे, काय टाळावे हे फारसे माहित नसते आणि त्यामुळे अनेक लहान - मोठे अपघात होण्याची शक्यता वाढते. विजेच्या कडकडाटामुळे  शॉक किंवा आग लागणे किंवा इतर दुर्घटना टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते. वीज कडाडत असताना सुरक्षित राहण्यासाठी व आपला जीव वाचवण्यासाठी नेमकी कोणती खबरदारी घ्यायला हवी ते पाहूयात. 

पावसाळ्यात वीज कडाडत असताना कोणती काळजी घ्यावी ? 

१. वीज कडाडत असताना ३० - ३० चा रुल लक्षात ठेवणे गरजेचे असते. वीज चमकत असताना ३० सेकंदात ढगही गडगडू लागले तर हा धोक्याचा इशारा मानला जातो. अशावेळी ढग गडगडत असताना किंवा वीज चमकत असताना एका सुरक्षित जागीच थांबावे, आणि गडगडणे किंवा विजांचा कडकडाट थांबल्याच्या ३० मिनीटांनंतरच तिथूनच निघावे. 

२. रस्त्यावर चालत असताना किंवा कोणतेही वाहन चालवत असताना जर विजा कडाडत असतील तर लगेच थांबून आसरा घेणे गरजेचे असते. आसरा घेताना झाडाखाली किंवा विजेच्या खांबाखाली उभं राहणं धोक्याचं असू शकत. यासाठी वीज कडाडत असताना चुकूनही चुकूनही झाड किंवा विजेच्या खंबा खाली उभे राहण्याची चूक करु नका. 

वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला उपमा खावा की पोहेच चांगले? पाेहे की उपमा-हे घ्या उत्तर...

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

३. वीज कडाडत असताना इमर्जन्सी म्हणून मोबाईलचा वापर करु शकता, परंतु मोबाईल देखील शक्यतो गरजेपुरताच किंवा इमर्जन्सी म्हणून वापरा. याचबरोबर, वायर हेडफोनचा वापर करणे टाळा. 

४. जर आपण विजेचा कडकडाट होत असताना फोर व्हीलर चालवत असाल तर गाडीच्या खिडक्या पूर्णपणे बंद करून गाडीतच बसून राहा. 

५. वीज कडाडत असताना जर आपण खुल्या जागेत असाल आणि आसरा घ्यायला कोणतीच जागा नसेल तर 'लाईटनिंग क्राऊच' (Lightning Crouch) पोझिशनमध्ये बसण्याचा सल्ला दिला जातो. दोन्ही पाय एकमेकांना जोडून ठेवावे मग गुडघ्यात वाकून खाली बसावं. शक्य असल्यास पायांत रबरी चप्पल घालावी. डोकं व चेहरा शक्य तितका दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झुकवावा आणि हातांनी कान झाकावेत. जमिनीला शरीराचा कमीत कमी भाग लागेल याची काळजी घ्यावी. कारण वीज कडाडल्यावर ती जमिनीतून पसरते. जर शरीराचा जास्त भाग जमिनीला स्पर्श करत असेल, तर विजेचा झटका अधिक तीव्रतेने बसतो.'लाईटनिंग क्राऊच' या पोझिशनमुळे जमिनीला शरीराचा कमीत कमी स्पर्श होत असल्याने विजेचा धोका कमी होतो आणि थेट आघात होण्याची शक्यता टाळता येते. 

बटाटे उकडताना फुटतात, लगदा होतो? ८ टिप्स - बटाटे उकडण्याची परफेक्ट पद्धत, काम होईल झटपट...

अशाप्रकारे मुसळधार पाऊस आणि विजा कडाडत असताना आपण कोणताही अपघात होऊ नये म्हणून स्वतःची काळजी घेऊ शकता.

टॅग्स :सोशल व्हायरलपाऊस