उपमा, शिरा किंवा गोडाचे पदार्थ बनवताना आपल्या घरात हमखास रव्याचा वापर केला जातो. रव्याचे लाडू, खीर किंवा टिक्की बनवताना रवा हा वापरला जातो. (How to store rava semolina) आठवड्यातून एकदा तरी नाश्त्यामध्ये रव्याची चव चाखली जाते. रवा हा आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण त्यात असणारे पोषक तत्व शरीराच्या विकासासाठी चांगले ठरतात.(Preserve semolina from bugs)
किराणामाल भरताना ऐनवेळी गडबड नको म्हणून आपण घरात काही वस्तू जास्तीच्या भरून ठेवतो. ( Natural ways to preserve rava) गहू, तांदूळ, डाळीसोबतच रव्याचे एक्स्ट्रा पॅकेट आपल्या घरात नेहमी पाहायला मिळते. परंतु, रव्याचे पाकिट एकद फोडले की, उरलेला रव्यात अळ्या, कीड लागणे किंवा त्याचे गोळे तयार होतात.(Insect-proof storage for rava) कितीही स्वच्छ ठिकाणी रव्याचा डब्बा ठेवला तरीही त्याला किड लागतेच. त्यामुळे फेकून देण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. जर आपल्यासोबतही असेच वारंवार होत असेल तर हे ५ सोपे उपाय कायम लक्षात ठेवा, ज्यामुळे रवा एकदम फ्रेश राहिल. (Kitchen hacks to prevent bugs in flour)
पाणी- डिटर्जंटशिवाय धुता येतात जाडजूड ब्लँकेट-रजई, ३ सोप्या टिप्स, भिजवण्याची गरज नाही...
1. कडुलिंबाचा पाला
रव्यातील किटकांपासून सुटका हवी असल्यास कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरतील. यासाठी कडुलिंबाची सुकवलेली पाने रव्यामध्ये काही वेळ घालून उन्हाळात ठेवा. यामुळे कीटक दूर राहातील. तसेच रवा फ्रेश आणि ताजा राहिल. ज्या डब्यात रवा साठवणार असाल पॅकेटमध्ये रव्या चांगला बंद करुन डब्याच्या तळाशी कडुलिंबाची पाने ठेवा.
2. तमालपत्र
आपल्या स्वयंपाकघरात मसाल्याचा डब्बा हमखास असतो. त्यास असणारं तमालपत्र पदार्थाची चव वाढवण्यासोबतच ते अधिक काळ टिकवण्यासही मदत करते. रव्याला किड लागत असले किंवा त्याचे गोळे तयार होत असतील तर तमालपत्राचा वापर करु शकता. रव्याच्या डब्यात ३ -४ तमालपत्रे घाला. ज्यामुळे रवा बराच काळ ताजा राहाण्यास मदत होईल.
धान्याला लागणार नाही कीड- पडणार नाही अळ्या, वर्षभर टिकतील डाळ-तांदूळ - ३ उपाय
3. कापूर
रव्यातील कीटक काढण्यासाठी कापूर चांगला आहे. जर रव्यात अळ्या किंवा बुरशी जमा होत असेल तर वर्तमानपत्रावर रवा पसरवून घ्या. त्यात कापूरचे छोटे तुकडे पसरवा. कापूरच्या वासाने कीटक नाहीसे होण्यास मदत होईल.
4. मीठ
रव्याला कीड किंवा अळ्या लागत असतील आणि अधिक काळ साठवण्यासाठी मीठाचा वापर करा. यासाठी मीठाचे खडे घेवून त्याचे लहान तुकडे करा. रवा ज्या डब्यात ठेवणार आहात त्यात मीठाचे खडे ठेवा. यामुळे कीड लागणार नाही.
5. लवंग
स्वयंपाकघरातील महत्त्वाचा मसाला लवंग. जो आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. रव्यामध्ये अळ्या, बुरशी किंवा ओलावा सुटत असेल तर १० ते १२ लवंगच्या पाकळ्या कागदात गुंडाळून रव्याच्या डब्यात ठेवा. याच्या वासामुळे रव्याला कीड लागणार नाही. तसेच रवा ताजा राहातो. खूप जास्त अळ्या झाल्या असतील तर कडक उन्हात रवा पसरवून ठेवा. त्यात लवंग घाला. ज्यामुळे कीटकनाशक दूर होतील.