Join us

दर पावसाळ्यात हमखास छत्री हरवते? ४ भन्नाट ट्रिक्स, चुकूनही तुमची छत्री यंदा हरवणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 18:26 IST

How To Never Lose An Umbrella Again छत्री ऐन पावसाळ्यात हरवते, आपण कुठंतरी विसरतो, ते टाळण्याची पाहा मस्त ट्रिक

'अरे देवा!! आज पण छत्री विसरले'. असं देखील तुमच्यासोबत घडते का? पावसाळा आला की जवळपास सर्वांच्या घरी छत्री विसरण्यासंबंधीच्या चर्चा ऐकायला येतात. पावसाळा आला की, छत्री, रेनकोट घेण्यासाठी लोकांची लगबग सुरु होते. पावसात भिजण्यापासून स्वतःचे सरंक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर होतो.

परंतु, नकळत आपल्याकडून छत्री हरवली जाते. कारण छत्रीचा वापर फक्त पावसाळ्यात होतो. त्याचा दैनंदिन आयुष्यात वापर होत नाही, त्याची सवयी नसल्यामुळे सुरुवातील छत्री कॅरी करायला आपण विसरतोच. ज्यामुळे बऱ्याचदा आपल्याला पावसात भिजण्याची वेळ येते. परंतु, पावसाळ्यात आपण देखील छत्री विसरून जाऊ नये म्हणून या टिप्स फॉलो करून पाहा(How To Never Lose An Umbrella Again).

लहान छत्री खरेदी करा

छत्री अश्या साईजची खरेदी करा, जी आकाराने लहान असेल, व ती बॅगेत फिट होईल. मोठ्या आकाराच्या छत्र्या बॅगेत मावत नाहीत. म्हणून आपण छत्रीचा वापर झाल्यानंतर इतत्र ठेवतो. अशा स्थितीत आपण छत्री कुठे ठेवली आहे हे कामाच्या गडबडीत विसरून जातो. त्यामुळे आकाराने लहान असणारी छत्री खरेदी करा.

स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

प्लास्टिक पिशवी कॅरी करा

ओली छत्री कॅरी करण्यासाठी आपण बॅगेत पिशवी ठेवतो, अनकेदा आपण ओली छत्री सुकवण्यासाठी बाहेर ठेवतो, व कामाच्या गडबडीत तिथेच विसरतो. प्लास्टिकची पिशवी बॅगेत असल्यामुळे आपल्याला छत्री कॅरी करण्याचे लक्षात राहते.

बॅगेला एक हुक लावा

प्रवास करताना छत्री इतरत्र ठेवावी लागू नये म्हणून, बॅगेला एक हुक लावा. व त्या हुकवर छत्री अडकवा. हुकमुळे आपल्याला छत्री लक्षात राहील.

अजिबात न दमता २ मिनिटांत पंखा पुसण्याची १ सोपी ट्रिक, सिलिंग फॅन दिसेल चकाचक

येण्या - जाण्याच्या मार्गावर ठेवा

छत्री नेहमी घरातील येण्या - जाण्याच्या मार्गावर ठेवा. अथवा शू रॅकजवळ ठेवा. किंवा दाराजवळ हुक लावून छत्री त्या ठिकाणी अडकवून ठेवा, जेणेकरून ती तुम्हाला दिसेल आणि कुठेही जाताना छत्री घेऊन जायला आपण विसरणार नाही. 

टॅग्स :मोसमी पाऊससोशल मीडियासोशल व्हायरल