Join us  

फरशीची चमक हरवली? डाग निघतच नाही? पाण्यात मिसळा स्वस्तात मस्त ३ गोष्टी; फरशी आरशासारखी चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 1:08 PM

How to make the floor shine like a mirror : फरशी नियमित पुसूनही चमकत नसेल तर, आपली फरशी पुसण्याची पद्धत चुकत आहे..

घराची साफ सफाई करणं खरंतर अवघड काम. रोज भांडी, कपडे यासह लादी पुसायला लागतेच. मुख्य म्हणजे केर काढण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत यात अधिक वेळ जातो. बऱ्याच घरात फरशी रोज पुसली जाते. पण रोज जरी फरशी पुसली तरी, फरशी बऱ्याचदा कळकट, खाण्यापिण्याचे डाग उठून दिसतात (Floor Shine). काही घरांमध्ये लहान मुलं असतात, जे फरशीवर रांगतात. त्यामुळे दररोज फरशी पुसणे अनिवार्य आहे (Cleaning Tips).

काही लोकं हाताने लादी पुसतात तर, काही मॉपचा वापर करतात. पण तरीही फरशीवरील डाग निघत नसेल तर, पाण्यात ३ गोष्टी मिक्स करा. यामुळे फरशी स्वच्छ होईल. शिवाय त्यातून गंधही येणार नाही. त्यामुळे फरशी पुसताना त्यात ३ गोष्टी मिसळायला विसरू नका(How to make the floor shine like a mirror).

फरशी पुसताना पाण्यात मिसळा ३ गोष्टी

घराची फरशी रोज पुसायला हवी. पण तरीही फरशीवरचे डाग, फरशीचे कोपरे स्वच्छ होत नसतील, शिवाय कितीही पुसली तरी, फरशी चकचकीत दिसत नसेल, तर लादी पुसण्याची ही टेक्निक वापरून पाहा. घराची फरशी आरश्यासारखी चमकावी असं वाटत असेल तर, फरशी पुसताना ३ गोष्टी मिसळा. शिवाय काही गोष्टी लक्षात ठेवा.

रोबोटने म्हणे महिला पत्रकारसोबत केलं आक्षेपार्ह कृत्य? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले..

- फरशी अधिक चिकट आणि कळकट दिसत असेल तर, फरशी पुसण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे डिश सोप, एक कप व्हाईट व्हिनेगर आणि दोन चमचे बेकिंग सोडा घाला. हे सर्व मिसळल्यानंतर गॅस बंद करा.

- पाणी कोमट झाल्यानंतर एका बादलीमध्ये काढून घ्या. त्यात मॉप किंवा लादी पुसण्याचे फडके बुडवून फरशी पुसून घ्या. फरशी फक्त एकदाच नसून, दोन वेळा पुसून घ्या.

- जर घरात व्हिनेगर नसेल तर, पाण्यात आपण डिश लिक्विड आणि अर्धा कप लिंबाचा रस मिक्स करून लादी पुसू शकता. यामुळेही लादी चकचकीत चमकेल.

चुकचुकणाऱ्या पालींवर करा १ जबरदस्त घरगुती उपाय; न मारता-घरातून काढतील सुसाट पळ

- मुख्य म्हणजे पाण्यात फक्त मीठ घातल्याने लादी चमकते, शिवाय त्यावरील बॅक्टेरिया नष्ट होतात. आपण आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने लादी पुसू शकता. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल