Lokmat Sakhi >Social Viral > १ रिकामी बाटली आणि खर्च १० रुपये, घरीच तयार करा अत्यंत सुगंधी रुम फ्रेशनर! घरभर प्रसन्न वातावरण..

१ रिकामी बाटली आणि खर्च १० रुपये, घरीच तयार करा अत्यंत सुगंधी रुम फ्रेशनर! घरभर प्रसन्न वातावरण..

How To Make Room Freshener At Home: घर, बाथरुम सुगंधित ठेवण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(simple tips and tricks to make room freshener at home)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 17:53 IST2025-04-21T14:18:03+5:302025-04-22T17:53:52+5:30

How To Make Room Freshener At Home: घर, बाथरुम सुगंधित ठेवण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(simple tips and tricks to make room freshener at home)

how to make room freshener at home, simple tips and tricks to make room freshener at home, home made room freshener | १ रिकामी बाटली आणि खर्च १० रुपये, घरीच तयार करा अत्यंत सुगंधी रुम फ्रेशनर! घरभर प्रसन्न वातावरण..

१ रिकामी बाटली आणि खर्च १० रुपये, घरीच तयार करा अत्यंत सुगंधी रुम फ्रेशनर! घरभर प्रसन्न वातावरण..

Highlightsआता ही एक सोपी ट्रिक पाहा आणि घरच्याघरी अतिशय सुगंधी रूम फ्रेशनर तयार करा...

आपलं घर नेहमीच सुगंधित राहावं असं आपल्याला वाटतं. कारण घरात जर एखादा मंद सुगंध दरवळत असेल तर आपोआपच मन फ्रेश होण्यास मदत होते. आपल्याला आनंदी आणि प्रसन्न वाटतं. त्यामुळे हल्ली बरेच जण दर महिन्याला एखादं तरी रुम फ्रेशनर विकत आणतात. पण रुम फ्रेशनरच्या किमती खूप जास्त असतात. त्यामुळे ते सगळ्यांनाच परवडेल असं नाही. म्हणूनच तर आता ही एक सोपी ट्रिक पाहा आणि घरच्याघरी अतिशय सुगंधी रूम फ्रेशनर तयार करा (how to make room freshener at home?). यासाठी आपल्याला १० रुपयांपेक्षाही कमी खर्च लागेल.(simple tips and tricks to make room freshener at home)

 

घरच्याघरी रूम फ्रेशनर कसं तयार करावं?

घर, बाथरुम सुगंधी ठेवण्यासाठी घरच्याघरी रुम फ्रेशनर कसं तयार करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ Magic Kitchen Ka Zayka या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

मान- पाठ- खांदे खूप दुखतात? पाण्याची बाटली घेऊन करा 'हा' व्यायाम- आखडलेले स्नायू होतील मोकळे

हा उपाय करण्यासाठी पाण्याची रिकामी बाटली घ्या. या बाटलीचा खालचा भाग आणि वरचा भाग आपल्याला वापरायचा आहे. त्यामुळे मधला भाग कापून काढून टाका.

आता एक काटा चमचा गॅसवर गरम करा आणि त्याच्या मदतीने बाटलीच्या झाकणाला आणि झाकणाखालच्या थोड्या भागाला छिद्रं पाडून घ्या.

 

यानंतर बाटलीचा जो खालचा कापलेला भाग आहे त्यामध्ये २ चमचा मीठ, १ शाम्पूचा सॅशे आणि १ चमचा हॅण्ड सॅनिटायझर घाला. हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्या.

फ्रिजमध्ये ठेवूनही आलं सुकून जातं? १ सोपी ट्रिक- आल्याचा सुगंध, ताजेपणा महिनाभर टिकून राहील

आता त्यामध्येच ३ ते ४ लवंग आणि ७ ते ८ कापुर वड्या टाका. बाटलीचा वरचा भाग बाटलीच्या खालच्या भागात अडकवून द्या. आता या बाटल्या तुम्ही तुमच्या घरात पाहिजे तिथे ठेवून घर सुगंधी करू शकता.

या बाटल्यांना जर छान आकर्षक रंग दिला तर त्या उठून दिसतील आणि घरातल्या हॉलमध्येही ठेवता येतील. 

 

Web Title: how to make room freshener at home, simple tips and tricks to make room freshener at home, home made room freshener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.