Join us

तवा काळाकुट्ट झाला, तेलकट थर निघत नाही? १ उपाय - तवा दिसेल नव्यासारखा लखलखीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2025 14:44 IST

how to make pan bottom shiny again : How To Clean Pan Bottom With Simple Kitchen Trick : घरगुती क्लिनर वापरुन काळाकुट्ट तव्याचा पृष्ठभाग न घासताच, मिनिटभरात नव्यासारखा स्वच्छ करण्याची खास टीप...

आपल्या स्वयंपाकघरातील काही भांडी अशी असतात जी अगदी नेहमीच वापरली जातात. चपाती करण्यापासून ते पापड भाजण्यापर्यंत अनेक पदार्थ तयार करण्यासाठी तव्याचा वापर दररोज होतोच. पण सततच्या वापरामुळे तव्याच्या पृष्ठभागावर तेल, मसाले आणि अन्नपदार्थांचे कण चिकटून तो काळाकुट्ट होतो. तव्याच्या पृष्ठभागावर तेलकट, चिकट असा थर तयार झाला की वेळीच स्वच्छ करावा लागतो. हा चिकट थर घासून काढणे खूपच कठीण काम वाटते. तव्याच्या पृष्ठभागावरील असा चिकट थर फक्त दिसायलाच वाईट नसतो, तर आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक ठरतो. अशा तव्यावर शिजवलेले अन्नपदार्थही नीट शिजत नाही आणि त्याची चव देखील बदलते. अनेकदा बाजारातील महागड्या केमिकल क्लीनर्सचा वापर करूनही हवा तसा फरक पडत नाही(how to make pan bottom shiny again).

तव्याच्या पृष्ठभागावरील काळाकुट्ट साचलेला थर घासणीने घासून काढणे देखील मोठे अवघड काम असते. अशा परिस्थितीत, स्वयंपाकघरातीलच काही पदार्थांच्या मदतीने आपण इन्स्टंट घरगुती क्लिनर झटपट तयार करु शकतो. या क्लिनरच्या मदतीने आपण काळाकुट्ट झालेला तव्याचा पृष्ठभाग न घासताच, फारशी मेहेनत न घेता  अगदी मिनिटभरातच नव्यासारखाच स्वच्छ, लखलखीत करु शकतो. तव्याच्या पृष्ठभागावरील हट्टी चिकटपणा आणि काळे डाग काढून तवा पुन्हा नवा आणि स्वच्छ (How To Clean Pan Bottom With Simple Kitchen Trick) करण्यासाठी बघा हा खास उपाय... 

तव्याच्या पृष्ठभागावरील हट्टी चिकटपणा आणि काळे डाग काढण्याचा उपाय... 

तव्याच्या पृष्ठभागावरील हट्टी चिकटपणा आणि काळे डाग काढण्याचा घरगुती उपाय manjumittal.homehacks या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तव्याचे पृष्ठभाग काळेकुट्ट होऊन खराब, चिकट होतात अशावेळी ते स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय करताना, २ टेबलस्पून बेकिंग सोडा, १ टेबलस्पून टूथपेस्ट, १ टेबलस्पून डिश वॉश लिक्विड सोपं, १/२ कप कोणत्याही प्रकारचे कोल्ड ड्रिंक इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

ऑफिसात एकाच जागी बसून मान, पाठ, कंबर आखडली? नॅपकिनचा १ भन्नाट उपाय - दुखणं गायब, मिळेल आराम...  

लघवीला उग्र दुर्गंधी येते ? दुर्लक्ष करू नका, लघवीतील 'या' बदलांकडे दुर्लक्ष केल्यास पडू शकते महागात... 

उपाय नेमका काय आहे ? 

एका बाऊलमध्ये, बेकिंग सोडा घेऊन त्यात टूथपेस्ट, डिश वॉश लिक्विड सोपं, कोल्ड ड्रिंक असे सगळे घटक एकत्रित घेऊन मिसळून घ्यावे. सगळे मिश्रण कालवून त्याचे मध्यम कन्सिस्टंन्सीचे द्रावण तयार करून घ्यावे. तयार द्रावण घासणी किंवा स्क्रबरच्या मदतीने काळ्याकुट्ट तव्याच्या पृष्ठभागावर लावून हलकेच घासून घ्यावे. त्यानंतर १० ते १५ मिनिटे हे मिश्रण तव्याच्या पृष्ठभागावर तसेच ठेवून द्यावे. मग गरम पाणी ओतून या पाण्याने तवा स्वच्छ धुवून घ्यावा. हा उपाय आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा केल्यास तव्याच्या पृष्ठभागावर चिकट, काळाकुट्ट थर साचून राहत नाही. हा उपाय वापरुन तवा स्वच्छ धुतल्यास तव्याचा पृष्ठभाग नव्यासारखा स्वच्छ आणि चमकदार दिसू लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Clean blackened pans easily with this simple home remedy.

Web Summary : Blackened pans are a common kitchen problem. This article suggests using baking soda, toothpaste, dish soap, and cold drink mixture. Apply, scrub gently, leave for 15 minutes, then wash with warm water for a sparkling clean pan.
टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्सहोम रेमेडी