Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > होली है..! यंदा खेळा ऑरगॅनिक होळी, वाटीभर बिटाचा असा करा नॅचरल गुलाबी रंग-५ मिनिटांचं सोपं काम

होली है..! यंदा खेळा ऑरगॅनिक होळी, वाटीभर बिटाचा असा करा नॅचरल गुलाबी रंग-५ मिनिटांचं सोपं काम

Organic Holi: Natural Holi colors: Homemade pink color: वाटीभर बीटाच्या रसापासून आपण गुलाबी गुलाल तयार करु शकतो. यासाठी लागणारे साहित्य पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 14:43 IST2026-02-26T14:36:21+5:302026-02-26T14:43:28+5:30

Organic Holi: Natural Holi colors: Homemade pink color: वाटीभर बीटाच्या रसापासून आपण गुलाबी गुलाल तयार करु शकतो. यासाठी लागणारे साहित्य पाहूया.

How to make natural pink Holi color at Home 5 minute DIY beetroot Holi color recipe Safe and chemical-free Holi color for skin Organic Holi celebration ideas at Home Homemade gulal using beetroot | होली है..! यंदा खेळा ऑरगॅनिक होळी, वाटीभर बिटाचा असा करा नॅचरल गुलाबी रंग-५ मिनिटांचं सोपं काम

होली है..! यंदा खेळा ऑरगॅनिक होळी, वाटीभर बिटाचा असा करा नॅचरल गुलाबी रंग-५ मिनिटांचं सोपं काम

होळी आणि रंगपंचमी सण भारतात सगळीकडे साजरा केला जातो. या सणानिमित्त डोळ्यांसमोर येतात ते हवेत उडणारे रंग आणि आनंदाने माखलेली चेहरे. पण मागच्या काही वर्षांत या आनंदाला केमिकलच्या रंगांचे ग्रहण लागले आहे.(Organic Holi)  बाजारात मिळणारे स्वस्त आणि गडद रंग दिसायला आकर्षक असले तरी, त्यात काचपावडर, शिसं (Lead) आणि घातक रसायनांचा वापर केला जातो. यामुळे त्वचेला खाज सुटणे, रॅशेस येणे, डोळ्यांची आग होणे,  केसांचा पोत खराब होणे अशा गंभीर समस्या उद्भवतात. विशेषतः लहान मुलांच्या नाजूक त्वचेसाठी हे रंग अत्यंत हानिकारक ठरतात. (Natural Holi colors)
नैसर्गिक रंग महागड्या किमतीत बाहेरुन विकत घेण्यापेक्षा, आपण आपल्या स्वयंपाकघरातील साहित्याचा वापर करुन ते घरीच तयार करु शकतो. निसर्गाने आपल्या रंगांची उधळण करण्यासाठी बीट, हळद, कडुनिंब यांसारखी अनेक गोष्टी दिल्या. त्यापैकी बीट (Beetroot) हा गुलाबी गुलाल बनवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. वाटीभर बीटाच्या रसापासून आपण गुलाबी गुलाल तयार करु शकतो. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. (Homemade pink color)

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

बीट - १ मोठे 
कॉर्नफ्लोअर - २ कप 
गुलाब पाणी 
चाळणी 
मिक्सर 

1. सगळ्यात आधी बीट स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्या. नंतर ते किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये लावून त्याचा घट्ट रस काढा. रस काढताना त्यात भरपूर पाणी घालू नका, यामुळे रंग व्यवस्थित तयार होणार नाही. 

2. एका मोठ्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर घाला. त्यात बीटाचा अर्क थोडा-थोडा घालून हाताने मिक्स करा. गुलाबी रंग येईपर्यंत अर्क मिसळत राहा. गडद रंग हवा असेल तर त्यात जास्त रस वापरा आणि फिका गुलाबी रंग हवा असेल तर रसाचे प्रमाण कमी ठेवा. 

3. मिश्रण ओले किंवा त्याचे गोळे जमतील. त्यासाठी एका मोठ्या ताटात किंवा पेपरवर पातळ पसरवून ठेवा. मिश्रण सावलीत सुकवा, उन्हात सुकवल्यास त्याचा नैसर्गिक रंग जाऊ शकतो. 

4. मिश्रण पूर्ण सुकल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. यामुळे गुलाल मऊ होईल. नंतर चाळणीने चाळून घ्या. या नैसर्गिक गुलालाने त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही. 

5. घरी तयार केलेला हा नैसर्गिक गुलाल आपल्याला त्वचेसाठी चांगला आहे. यात केमिकल्स नसल्यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याऐवजी पोषण मिळते. तसेच रंग लवकर निघतो. मुले होळी खेळताना अनेकदा रंग तोंडात घालतात. बीट हा खाद्यपदार्थ असल्यामुळे पोटासाठीही घातक नसतो. 
 

Web Title : होली सुरक्षित खेलें: घर पर चुकंदर से बनाएं प्राकृतिक गुलाबी रंग।

Web Summary : इस होली हानिकारक रसायनों से बचें और घर पर चुकंदर से प्राकृतिक गुलाबी रंग बनाएं। यह त्वचा के लिए सुरक्षित है, मकई के आटे और गुलाब जल से बनाना आसान है। घर के बने रंग से खुद और अपने बच्चों को सुरक्षित रखें।

Web Title : Play Holi safely: Make natural pink color from beetroot at home.

Web Summary : Avoid harmful chemicals this Holi by making natural pink color at home using beetroot. It's safe for skin, easy to make with cornflour and rosewater. Protect yourself and your kids with homemade color.