महागड्या ब्यूटी प्रोडक्ट्स विकत घेताना आपण हजारो रुपये खर्च करतो. पण वापरताना लक्षात येतं की काही दिवसांच्या आत त्या सुकतात, घट्ट होतात आणि वापरण्यायोग्य राहत नाहीत.(how to fix dry cream) लिपस्टिक सुकते, मस्करा घट्ट होतो, आयलाइनर ड्राय होतो, क्रीममध्ये गुठळ्या होतात.(beauty product hacks) अशावेळी आपण वैतागून प्रोडक्ट फेकून देतो. पण सांगायचं झालं तर काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर हे सगळं पुन्हा वापरण्यासारखं बनवता येतं, ज्यामुळे आपले पैसे देखील वाचतात. (makeup product tips)
महागडे तुटलेले, कोरडे आणि अडकलेले मेकअप उत्पादने पूर्वीसारखं करण्यासाठी आपल्याला ५ टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील. जाणून घेऊया याबद्दल (revive dried eyeliner)
रोज लावा जास्वंदीच्या फुलांचे ‘हे’ तेल- महिनाभरात दिसेल फरक, डोक्यावरचा एक केस गळणार नाही
1. जर आपली देखील महागडी लिपस्टिक तुटली असले तर लाईटरच्या मदतीने लिपस्टिक थोडी वितळवा. आता ही वितळलेली लिपस्टिक पुन्हा कव्हरमध्ये ठेवा. १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. पुन्हा वापरण्यासारखी होईल.
2. जेव्हा आपला मस्करा सुकतो तेव्हा त्यात २ थेंब आय ड्रॉप्स टाकावे. आपल्याला हवे असल्यास यात आपण लेन्स सोल्यूशन देखील घालू शकतो. यानंतर मस्करा बंद करा आणि थोडा वेळ कोमट पाण्यात भिजवा. यामुळे मस्करा सहज वितळेल.
3. स्टॅक्ड नेल पेंट म्हणजे जर आपल्या नेलपेंटचे झाकण उघडत नसेल तर गरम पाण्यात ५ मिनिटे भिजवा. त्यानंतर झाकण रबर बँडवर बांधा आणि ते फिरवून पुन्हा उघडा. हे झाकण उघडल्यानंतर नेल पेंटच्या बाटलीवर कोणतीही क्रीम लावा. यामुळे ते पुन्हा अडकणार नाही.
4. जर आपले आयलानर सुकले असेल तर ते फेकून देण्याची गरज नाही. आपण कोरड्या बाटलीत २ थेंब आय ड्रॉप्स टाकू शकता. याशिवाय बाटलीत नारळाचे तेल देखील टाकू शकता. यामुळे आयलाइनर पुन्हा वापरता येते.
5. बऱ्याचदा आपली नेल पेंटही सुकते. जर आपली कोणतीही नेल पेंट सुकली असेल आणि पुन्हा वापरायची असेल. तर तुम्ही बाटलीत नेलपॉलिश रिमूव्हचे २ ते ३ थेंब टाका. यामुळे नेल पेंट पुन्हा वापरता येईल.