Lokmat Sakhi >Social Viral > ठंडा ठंडा कूल कूल! १० रुपयांच्या या ट्रिकनं कूलर देईल एसीसारखी थंड हवा, पाहा कसे..

ठंडा ठंडा कूल कूल! १० रुपयांच्या या ट्रिकनं कूलर देईल एसीसारखी थंड हवा, पाहा कसे..

Cooler Cool Tips : जसजसा उन्हाचा पारा वाढत जातो, कुलरही थंड हवा फेकणं कमी करतो. अशात कुलरची हवा थंड यावी यासाठी काही सोपे उपाय आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 20:16 IST2025-02-27T10:51:13+5:302025-02-27T20:16:41+5:30

Cooler Cool Tips : जसजसा उन्हाचा पारा वाढत जातो, कुलरही थंड हवा फेकणं कमी करतो. अशात कुलरची हवा थंड यावी यासाठी काही सोपे उपाय आहेत. 

How to make cooler air more cool with a simple hack using salt | ठंडा ठंडा कूल कूल! १० रुपयांच्या या ट्रिकनं कूलर देईल एसीसारखी थंड हवा, पाहा कसे..

ठंडा ठंडा कूल कूल! १० रुपयांच्या या ट्रिकनं कूलर देईल एसीसारखी थंड हवा, पाहा कसे..

Cooler Cool Tips :   तापमान वाढणं आता सुरू होणार आहे. देशातील काही भागांमध्ये उन्हाचा पारा आधीच वाढला आहे. फॅनशिवाय राहणं आताच अवघड झालं असून बरेच लोक कुलरची साफसफाई करण्यामागे लागले आहेत. जुनेच कूलर साफ करून, रिपेअर करून लावण्याची तयारी सुरू आहे. तर काही लोक नवीन कूलर घेण्याचा प्लॅनिंग करत आहेत. जसजसा उन्हाचा पारा वाढत जातो, कुलरही थंड हवा फेकणं कमी करतो. अशात कुलरची हवा थंड यावी यासाठी काही सोपे उपाय आहेत. 

जुन्या कुलर नव्या कुलरसारखी थंड हवा फेकावी यासाठी कुलरच्या पाण्यात दोन गोष्टी मिक्स करू शकता. थंड हवेसाठी उपाय करण्याच्या या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या किचनमध्येच मिळतील. त्यामुळे यासाठी वेगळे खूप जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. या दोन गोष्टी म्हणजे मीठ आणि बर्फ. जेव्हा मीठ बर्फात मिक्स केलं जातं, तेव्हा याचं तापमान मायनस होऊन २५ डिग्री सेल्सिअसपर्यंत येतं. ज्यामुळे कूलर आणखी जास्त थंड हवा देतो. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बर्फ आणि मीठ मिक्स केल्यानं तापमान कमी होतं आणि थंड वारा मिळतो. कमी प्रमाणात मीठ बर्फासोबत मिक्स करावं. कारण जास्त मीठ टाकल्यानं कूलरचं पाणी खराब होतं आणि कुलरच्या जाळ्याही खराब होऊ शकतात.

कसा कराल वापर?

कुलरचं बॅक पॅनल उघडा किंवा टबमध्ये बर्फाचे काही तुकडे टाका आणि त्यावर मीठ शिंपडा. त्यानंतर कुलरमधून तुम्हाला आधीपेक्षा जास्त थंड वारा मिळू लागेल. 

बरेच लोक कुलरची हवा थंड लागावी म्हणून कुलरमध्ये केवळ जास्त बर्फच टाकतात. मात्र, त्यावर जर मीठ शिंपडलं तर वारा आणखी जास्त थंड मिळू शकतो. आइसचा बॉयलिंग पॉइंट बर्फात मीठ मिक्स केल्यानं वाढतो. ज्यामुळे बर्फ लवकर वितळत नाही आणि जास्त वेळ टिकून राहतो.

आणखी एक उपाय

कुलरमधून थंड वारा यावा म्हणून तुम्ही मडक्याचा देखील वापर करू शकता. यासाठी एक मीडिअम साइजचं मडकं विकत आणा. त्यात छोटी छोटी छिद्र करा. आता हे मडकं कुलरच्या आत ठेवा. कुलर वॉटर पंप मडक्यात ठेवा. या छोट्याशा ट्रिकनं सुद्धा कुलर एसीसारखी थंड हवा देऊ शकतो.

Web Title: How to make cooler air more cool with a simple hack using salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.