दिवाळीची खासियत म्हणजे भरपूर दिवे, पणत्या आणि सगळीकडे रोषणाई. या दिवसांत तेलाच्या तुपाच्या पणत्या लावून आपणही घर उजळवून टाकतो. देवापुढे, लक्ष्मी पुजनाच्या पुजेसमोर तुपाच्या पणत्या लावतो. तर घरभर सगळीकडे तेलाच्या पणत्या लावल्या जातात. तेलाच्या किमतीतर आता भरपूर वाढल्या आहेत. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी पणत्यांमध्ये काठोकाठ तेल ओतताना थोडं नको- नको होतंच.. म्हणूनच आता हा एक खास उपाय पाहा. यामध्ये आपण कमीतकमी तेल वापरून जास्तीत जास्त तास पणत्या कशा तेवत ठेवायच्या ते पाहणार आहोत.(how to lighten diya using just a drop of oil?)
थेंबभर तेलामध्ये रात्रभर दिवे तेवत ठेवण्याचा उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीच्या पणत्या, कापसाच्या दोरवाती, थोडंसं तेल आणि पाणी एवढं साहित्य लागणार आहे.
छोट्या बियांची मोठी कमाल- चिया सीड्स खाण्याचे 'हे' फायदे वाचाल तर रोज आठवणीने खाल
सगळ्यात आधी तर तुम्हाला जेवढ्या पणत्या लावायच्या आहेत तेवढ्या वाती एका वाटीमध्ये एकत्र करा. यानंतर त्या वाटीमध्ये वाती बुडतील एवढं तेल टाका. यासाठी तुम्ही जर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरलं तर जास्त उत्तम. वाती तेलामध्ये चांगल्या बुडून ओलसर होऊ द्या.
यानंतर एक पणती घ्या. त्या पणतीमध्ये तेल घाला. तेल लगेचच एकाजागी गोळा होऊन पणतीमधल्या पाण्यावर तरंगू लागेल. आता तेलात भिजवलेली जी वात आहे ती वात पणतीमध्ये गोळा झालेल्या तेलामध्ये अलगद बुडवा. त्या वातीच्या अवतीभोवती तेल असायला हवे, अशा पद्धतीने ती पणतीमध्ये ठेवा.
धनत्रयोदशीला खरेदी करा कमी वजनाची सुंदर ठुशी! खिशाला परवडणाऱ्या किमतीत घ्या सुंदर दागिना..
यानंतर तुम्हाला जिथे ठेवायचा असेल तिथे हा दिवा ठेवा आणि लावा. बघा अगदी थेंबभर तेलात हा दिवा किती जास्त काळ तेवत राहील. दिवाळीच्या काळात कमीतकमी तेलात भरपूर दिवे लावण्यासाठी हा उपाय अगदी उत्तम आहे.