बहुतांश घरांमध्ये असं दिसून येतं की घराचा हॉल अगदी व्यवस्थित आवरलेला असतो. पण जसं जसं तुम्ही घरात जाता तसं तसं एकेका खोलीतला पसारा वाढायला सुरुवात झाली असते. आणि त्यात सगळ्यात जास्त पसारा स्वयंपाक घरातच होतो. याचं कारण हेच की स्वयंपाक घरात सतत काही ना काही काम सुरु असतं. त्यामुळे तिथे सगळ्यात जास्त पसारा होतो. पण सगळ्या घराचं आरोग्य स्वयंपाक घरातूनच सांभाळल्या जात असल्याने ते नेहमी स्वच्छ, आवरलेलं आणि टापटीप असणं खूप गरजेचं आहे (4 home hacks to keep your kitchen clean forever). त्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. फक्त काही सवयी स्वत:ला लावून घ्या आणि मग बघा हळूहळू तुमच्या स्वयंपाक घराचा कसा कायापालट होऊन जातो..(how to keep your kitchen always neat and clean?)
स्वयंपाक घर कसं स्वच्छ ठेवावं?
१. स्वयंपाक घरात अशा कित्येक वस्तू आपण ठेवलेल्या असतात ज्या आपण मागच्या एक- दोन वर्षांत मुळीच वापरलेल्या नसतात. पण फक्त कधीतरी उपयोगी पडेल म्हणून ते सांभाळून ठेवलेलं असतं.
महिन्यातून फक्त एकदा १ बटाटा घ्या, ‘हा’ उपाय करा! बागेतील प्रत्येक रोप फुलांनी डवरेल
अशा वस्तू सगळ्यात आधी बाहेर काढा आणि एखाद्या गरजवंताला देऊन टाका. कारण असं म्हणतात की जी वस्तू मागच्या एक ते दिड वर्षात तुम्ही वापरलेली नसते, त्या वस्तूंची खरंतर तुम्हाला अजिबात गरज नसते. असं केल्याने तुमच्या घरातला भरपूर पसारा कमी होईल.
२. स्वयंपाक घरातलं सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी हल्ली अनेक किचन ऑर्गनायझर मिळतात. लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत हे रॅक उपलब्ध असतात. असे काही ऑर्गनायझर आणा आणि त्यावर सामान व्यवस्थित मांडून ठेवा. ओट्यावरचा, डायनिंग टेबलवरचा बराच पसारा कमी होईल.
लव्ह हॅण्डल्स वाढल्याने लठ्ठ दिसताय? फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा- कंबरेवरची चरबी झरझर उतरेल
३. किचनच्या सिंकमध्ये आणि आजुबाजुला कित्येकदा खरकटी भांडी, चमचे, कपबशा पडलेल्या असतात. असं अजिबात ठेवू नका. कारण त्यामुळे खूप पसारा दिसतो. भांडी लगेचच्या लगेच विसळून टाका किंवा मग ती ठेवण्यासाठी एखादा मोठा टब करा आणि त्यात भांडी ठेवायला लागा.
४. जेव्हा तुमच्या ओट्यावर, डायनिंग टेबलवर खूप सामान ठेवलेलं असतं तेव्हा तुमचं स्वयंपाक घर खूप अस्ताव्यस्त दिसू लागतं. त्यामुळे ओट्यावर आणि डायनिंग टेबलवर नेहमी कमीतकमी सामान ठेवा. ट्रॉली किंवा किचन कॅबिनेटमध्ये जास्तीतजास्त सामान ठेवा. जेणेकरून बाहेरून काहीच पसारा दिसणार नाही.