Join us

घरात एसी नाही? टेन्शन कशाला? फॅनच्या हवेमुळेही खोली होईल थंड- विजेची देखील होईल बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2024 19:47 IST

How to keep your house cool in the summer without AC : कडाक्याच्या उन्हातही एसीशिवाय खोली राहील थंड; फक्त पंख्याचा वापर कसा करावा? पाहा

कडकडीत उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे (Summer Special). तापमानात सातत्याने वाढ होत आहे. घराघरात कुलर आणि एसी लावून घर थंड ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे (Fan). शिवाय काही लोक एसीच्या हवेखाली बसून शरीराला थंडावा देत आहेत. पण प्रत्येक घरात एसी असेलच असे नाही. किंवा २४ तास आपण एसी चालू ठेऊ असेही नाही (Without Ac).

एसी सतत चालू ठेवल्याने विजेचं बिल जास्त येते. त्यामुळे आपण अधिक वेळ एसी चालू ठेऊ शकत नाही. जर आपल्याला एसी शिवाय खोली थंड ठेवायची असेल तर, ३ टिप्सचा वापर करून पाहा.या टिप्समुळे एसी शिवाय फॅनच्या हवेतही खोली थंड राहील. मुख्य म्हणजे विजेची खूप बचतही होईल. खोली थंड ठेवण्यासाठी फॅनचा वापर कसा करावा ? पाहूयात(How to keep your house cool in the summer without AC).

बर्फाचे तुकडे

उन्हाळ्यात घराला एसीशिवाय थंड ठेवण्यासाठी पंख्यासमोर बर्फाने भरलेली बादली ठेवा. जसजशी हवा बर्फावरून पास होईल, तसतशी खोली थंडगार होईल. आणि ताजी हवा घरभर पसरेल.

उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी

खिडकी बंद ठेवा

यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या वेबसाईटनुसार, जर बाहेरचं वातावरण उष्ण असेल तर, खिडक्या बंद ठेवणं योग्य ठरू शकते. खिडक्यांमधून ३० टक्के गरम हवा घरात येते. ज्यामुळे पंखा तिच हवा घेऊन घरभर पसरवते. अशावेळी प्रत्येक खिडकीला व्यवस्थित झाकून त्यावर हलक्या रंगाचे सुती पडदे लावा. यामुळे खोली थंड राहील.

डाळी खाताना चुकूनही करू नका ४ चुका; शरीराला मिळणार नाही पोषण-उलट पचनास होईल त्रास

एक्झॉस्टचा वापर करा

घरात एक्झॉस्ट फॅन योग्य ठिकाणी लावावे. यामुळे घरातील गरम हवा बाहेर फेकली जाईल. ज्यामुळे घरात थंड हवा खेळती राहील. शिवाय स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट चालू ठेवा. जेणेकरून हवेसह उष्णता सतत बाहेर जात राहिल.

टॅग्स :समर स्पेशलसोशल मीडियासोशल व्हायरल