Join us

पावसाळ्यात खूप साप निघतात? घराच्या भोवती २ पदार्थ शिंपडा- साप घाबरून दूर पळतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 11:30 IST

Home Hacks: पावसाळ्याच्या दिवसांत सापांना तुमच्या घरापासून लांब ठेवायचं असेल तर हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा..(how to keep snakes aways from house in monsoon?)

ठळक मुद्देबाजारात विकत मिळणाऱ्या निम ऑईलचा उपयोग करून आपण सापांना घरापासून दूर ठेवू शकतो.

पावसाळ्याच्या दिवसांत झाडांची भराभर वाढ होते. शिवाय या दिवसांत मोकळ्या जागेत रान गवत, रानझाडंही खूप वाढतात. त्यामुळे सगळीकडे हिरवळ होते. गवतामुळे, झाडींमुळे मग त्या भागात सापांचं प्रमाणही खूप वाढतं. जी घर थोडी मोकळ्या जागेत, जमिनीवर असतात, त्या घरांमध्ये तर पावसाळ्यात नेहमीच साप निघतात. म्हणूनच या दिवसांत आपलं घर सापांपासून सुरक्षित ठेवायचं असेल तर हे काही घरगुती उपाय नक्कीच करून पाहा. साप निघण्याचं प्रमाण कमी होईल..(tips and tricks to keep our house safe from snakes in rainy days)

 

सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी काय उपाय करावे?

१. बाजारात विकत मिळणाऱ्या निम ऑईलचा उपयोग करून आपण सापांना घरापासून दूर ठेवू शकतो. फक्त ते थोडे जास्त स्ट्राँग करण्यासाठी त्यात इतर काही पदार्थही मिसळा. यासाठी साधारण १०० मीली नीम ऑईल घ्या. त्यामध्ये लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या ठेचून टाका.

झटपट चविष्ट स्वयंपाक करण्यासाठी ६ टिप्स-घाईगडबडीत केला स्वयंपाक तरी पदार्थ बिघडणार नाही

यानंतर त्यामध्ये २ मोठे चमचे फिनेल, २ चमचे ओव्याची पावडर आणि अर्धा लीटर पाणी घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि मग घराच्या आजुबाजुला तसेच खिडक्यांजवळ, दरवाज्यांजवळ शिंपडून ठेवा. या पाण्याचा वास खूप स्ट्राँग असल्याने साप घराच्या आजुबाजुला फिरकणारही नाहीत.

 

२. दुसरा उपाय म्हणजे कांदा आणि लसूण यांचा एकत्रित वापर. हा उपाय करण्यासाठी कांदा आणि लसूण यांची मिक्सरमधून अगदी बारीक पेस्ट करून घ्या.

गौराईसाठी फक्त ९९९ रुपयांत घ्या २ सुंदर सेमी सिल्क साड्या, आकर्षक डिझाईन्स आणि भरपूर रंग..

यानंतर साधारण १ वाटी  पेस्ट असेल तर ती एक लीटर पाण्यात मिक्स करा. आता हे पाणी घराच्या आजुबाजुला शिंपडून ठेवा. कांदा लसूण यांचा उग्र वास येताच साप दूर पळतील.

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीसुंदर गृहनियोजनमोसमी पाऊस