Join us

पुदिना निवडायलाच वेळ नाही? ‘असा’ ठेवा फ्रिजमध्ये, १५ दिवस राहील ताजा-सुगंधी आणि हिरवागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 16:22 IST

How To Keep Mint Or Pudina Fresh For Long: पुदिना जास्तीतजास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो ते पाहूया..(simple tips and tricks to keep pudina fresh)

ठळक मुद्देतुम्हाला पुदिना निवडण्यासाठी वेळ घालविण्याची अजिबातच गरज नाही.

कोणत्याही पदार्थाला अतिशय अप्रतिम सुगंध आणि चव आणण्यासाठी पुदिना अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या, आमटी यामध्ये आपण आवर्जून पुदिना घालतो. काही ठिकाणी पुदिन्याची चटणी नेहमीच खाल्ली जाते. तर अनेक जणी भजी, पराठा अशा पदार्थांमध्येही पुदिना घालतात. आता पुदिना घेतल्यानंतर तो निवडत बसायला अनेक जणींकडे अजिबातच वेळ नसतो. त्यामुळे तो न निवडता तसाच फ्रिजमध्ये ठेवला जातो. त्यानंतर पुढच्या २ ते ३ दिवसांतच तो खराब होऊन जातो. सडून जातो. म्हणूनच आता हा एक उपाय करून पाहा (How To Keep Mint Or Pudina Fresh For Long). तुम्हाला पुदिना निवडण्यासाठी वेळ घालविण्याची अजिबातच गरज नाही.(simple tips and tricks to keep pudina fresh)

 

पुदिना जास्त दिवस फ्रेश- सुगंधी ठेवण्यासाठी काय उपाय करावा?

पुदिना न निवडता फ्रिजमध्ये कसा साठवून ठेवावा, याविषयीची ही माहिती बहुतांश महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. या पद्धतीनेच तुम्ही कोथिंबीर, मेथी, शेपू अशा  पालेभाज्याही न निवडता साठवून ठेवू शकता.

उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

हा उपाय करण्यासाठी काचेची एक बाटली किंवा ग्लास घ्या. तो पाण्याने अर्धा भरा. आता त्या बाटलीमध्ये पुदिन्याची जुडी जशीच्यातशी घालून ठेवा. पुदिन्याच्या काड्या अर्ध्या पाण्यात बुडतील अशा पद्धतीने त्यात पाणी भरावे.

 

आता त्यावर प्लास्टिकची एक पिशवी घाला.  पुदिन्याची पानं प्लास्टिकच्या पिशवीने पुर्णपणे झाकून घ्या. यानंतर त्या पिशवीला एक रबर लावून ती ग्लासला पुर्णपणे पॅक करून टाका. आता या पद्धतीने ठेवलेला पुदिना फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

सणासुदीच्या दिवसात तुमच्याकडे हव्यात या ५ साड्या, रिच आणि रॉयल लूक असा की रुप लाखांत एक

तुम्हाला जेव्हा पुदिना पाहिजे असेल तेव्हा तो फ्रिजच्या बाहेर काढा. जेवढा पाहिजे तेवढा पुदिना तोडून घ्या आणि पुन्हा त्याच पद्धतीने उरलेला पुदिना फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नभाज्या