Join us

उकाड्यामुळे घरात राहणंही अवघड झालंय? छतावर लगेच करा 'हा' उपाय, उकाडा दूर होऊन वाटेल गारेगार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:35 IST

Use Of Chuna on roof : वाढत्या तापमानामुळे जर घरात तुमच्या अंगाची लाहीलाही होत असेल तर अजिबात काळजी करू नका. कारण यावर तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत.

Use Of Chuna on roof : उन्हाचा पारा सगळीकडेच भरपूर वाढला आहे. घरातील फॅन, कुलर, एसी सुद्धा हवं तसं काम करत नाहीयेत. एसी जरी या दिवसात काही प्रमाणात फायदेशीर ठरत असेल तरी सगळेच लोक एसी घेऊ शकतात असं नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, टेरेसवर एक खास उपाय करून तुम्ही घरा थंडगार ठेवू शकता. यासाठी तुम्हाला नक्कीच एसीपेक्षा कमीच खर्च लागेल.

वाढत्या तापमानामुळे जर घरात तुमच्या अंगाची लाहीलाही होत असेल तर अजिबात काळजी करू नका. कारण यावर तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून तुम्ही घर गारेगार ठेवू शकता. कन्टेन्ट क्रिएटर प्रशांत पाखी यांनी उन्हाळ्यात छतावर चुना लावण्याची एक पद्धत सांगितली आहे. त्यांनी दावाही केला आहे की, चुन्यामुळे घर एसीसारखं थंड राहू शकतं.

काय काय लागेल साहित्य?

20 लीटर पाणी

15 किलो चुना

2 लीटर फेविकॉल

3 किलो व्हाइट सीमेंट

4 लीटर झिंक ऑक्साईड

कसा कराल उपाय?

जेव्हाही तुम्हाला हा उपाय करायचा असेल त्या रात्री आधी चुना एका मोट्या टब किंवा भांड्यात 20 लीटर पाणी टाकून भिजवून ठेवा. चूना चांगला मुलायम होऊ द्या. रात्रभर चूना पाण्यात चांगला मिक्स होईल. चुना मिक्स करत असताना हातात ग्लव्स घालावे. कारण चुन्यानं हातांना फोडं येऊ शकतात.

कसा लावाल?

खडे असलेला चुना जेव्हा पाण्यात चांगला मुरेल तेव्हा त्यात फेव्हिकॉल, व्हाईट सीमेंट आणि झिंक ऑक्साईड टाका. जर हे मिश्रण जास्त घट्ट झालं असेल तर त्यात थोडं गरम पाणी टाकावं. हे मिश्रण छतावर लावत असताना ब्रशचा वापर करावा. पूर्ण छतावर चुन्याचं मिश्रण चांगलं पसरवा. यानं घरात जास्त उष्णता वाढणार नाही.

 

कसा काम करतो चुना?

चुना एक नॅचरल आणि स्वस्त कुलंट मानलं जातं. पांढरा रंग असल्यानं सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही छतावर चुना लावाल तर यानं छत गरम होणार नाही. अशात घरात आत थंड वाटेल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या उपायानं 10 डिग्रीपर्यंत तापमान कमी केलं जाऊ शकतं. 

टॅग्स :सोशल व्हायरलसमर स्पेशल