Join us

घरातल्या कुंडीत लावलेली कोरफड विषारी तर नाही? १ गोष्ट तपासा-चटकन कळेल -धोका टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2024 13:18 IST

How to identify poisonous Aloe vera : प्रत्येक कोरफड आपल्या फायद्याची ठरेल असे नाही, कोणती कोरफड वापरण्यायोग्य आहे पाहा..

कोरफडीचा (Aloe Vera) वापर आपण अनेक कारणांसाठी करतो. मुख्य म्हणजे त्वचा आणि केसांसाठी लाभदायक ठरते. कोरफडीचा वापर औषध म्हणून आपण करतोच, पण सौंदर्य प्रसाधन म्हणूनही बहुगुणी आहे. चवीला फारशी बेचव असली तरी, यातील गुणधर्मामुळे लोकं आवडीने याचे ज्यूस तयार करून पितात (Social Viral). पण आपल्याला कोरफडीच्या ६०० प्रजातींबद्दल कल्पना होती का?

भारतात कोरफडीच्या गराचा वापर बऱ्याच गोष्टींसाठी केला जातो. पण काही कोरफडीचे प्रकार विषारी मानल्या जातात (Gardening Tips). मग कोणत्या प्रकारची कोरफड आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल पाहा(How to identify poisonous Aloe vera).

अशा पद्धतीने ओळखा वापरण्यायोग्य कोरफड

- मोठी टोकदार पाने जे बाहेरच्या दिशेने झुकलेली असतील.

- पानाच्या काठाला निघालेले छोटे छोटे काटे.

- वरच्या दिशेने वाढणारे पाने.

गुलाबाचे रोप वाढले पण फुले येत नाहीत? खत म्हणून घाला १ गोष्ट, भरपूर येतील फुले

- नव्या पानांवर पांढरे ठिपके, शिवाय गडद हिरव्या रंगाच्या पानांचा वापर करा.

एलोवेरा जेल खाण्यायोग्य असते का?

एलोवेराची बर्बाण्डेसिस ही प्रजाती खाण्यायोग्य असते. आपण त्यातील गर काढून त्याचा ज्यूस तयार करू शकता. पण इतर प्रजातीचे एलोवेरा जेल खाण्यापूर्वी तपासून घ्या. कारण बरेचसे कोरफडीमध्ये विषारी घटक असतात.

घरातल्या लहानशा कुंडीतही लावता येईल मिरचीचं रोप, मातीत मिसळा १ खास गोष्ट, भरपूर येतील मिरच्या

एलोवेरा जेलचे फायदे

एलोवेरा जेलमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्याने त्वचेला फायदा तर होतो, शिवाय मुरुमांचे डाग, यासह इतर त्वचेच्या निगडीत समस्या सोडवण्यास मदत करतात. एलोवेरा जेल दररोज त्वचेवर लावल्यामुळे हानिकारक बॅक्टेरीया नष्ट होतात.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल