Join us

स्वयंपाक घर खूपच जुनाट दिसतंय? ५ गोष्टी बदलून पाहा, मॉडर्न लूक मिळून किचन होईल टापटीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2025 15:19 IST

Kitchen Tips: कमीत कमी पैशांत स्वयंपाक घराचा मेकओव्हर करण्यासाठी ५ टिप्स..(how to give modern and Aesthetic look to your old kitchen?)

ठळक मुद्देट्रे,  चमचे, मसाल्यांचा डबा, चमचा ठेवण्याचे स्टॅण्ड, चहा- साखरेचे डबे या प्रत्येक गोष्टीत आजकाल खूप नवनवे प्रकार मिळतात. शिवाय त्यांची किंमतही जास्त नसते.

स्वयंपाक घर ही आपल्या घरातली अशी जागा असते जिथे गृहिणींचा सर्वाधिक वेळ जातो आणि तिथूनच सगळ्या घराचं आरोग्य सांभाळलं जातं. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ, टापटीप आणि नेटकं असणं गरजेचं आहे. शिवाय स्वयंपाक घर जर स्वच्छ आणि गृहिणीच्या मनासारखं असेल तर तिथे काम करताना साहजिकच त्या स्त्रीला जास्त प्रसन्न, आनंदी वाटतं. याचा संपूर्ण घराच्या सकारात्मकतेवरही खूप परिणाम होतो. म्हणूनच जर तुमचं किचन तुम्हाला जुनाट वाटत असेल, तिच्या मेकओव्हर करून बाकीच्या घराप्रमाणे त्याला थोडा मॉडर्न लूक देऊन टापटीप, नेटकं करायचं असेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स नक्कीच उपयोगी येऊ शकतात.(how to give modern and Aesthetic look to your old kitchen?)

 

कमीतकमी पैशांत स्वयंपाकघराचा मेकओव्हर करण्यासाठी टिप्स

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टीलचे ताट, वाटी, प्लेट काढून टाका. त्याऐवजी सिरॅमिक डिश, वाट्या किंवा इतर भांडी वापरा. 

२. स्वयंपाक घरातल्या प्लास्टिच्या बाटल्या काढून टाका आणि त्याऐवजी मातीच्या, काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरा.

हिवाळ्यासाठी स्टायलिश, ट्रेण्डी स्वेटर घ्यायचं? खिशाला परवडणाऱ्या किंमतीत घ्या हटके डिझाईन्स

३. वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिकच्या डब्या, डबे स्वयंपाक घरातून काढून टाका आणि त्याऐवजी सिरॅमिक, काच अशा बरण्या वापरा. स्वयंपाक घरातले वेगवेगळे साहित्य, चटण्या, लोणची असं सगळं ठेवण्यासाठी एकासारख्या वस्तू वापरा.

 

४. किचन ऑर्गनायझरचे कित्येक प्रकार बाजारात मिळतात. त्यांची किंमतही खिशाला परवडणारी असते. असे ऑर्गनायझर आणा आणि त्यात सामान ठेवा. बरीच जागा मोकळी झाल्यासारखी वाटेल.

५. डायनिंग टेबल, फ्रिज, मिक्सर, मायक्रोवेव्ह यांना कव्हर नक्की घाला. त्यामुळे त्यांचा लूक बदलतो आणि किचनही जास्त स्मार्ट दिसतं.

मलई ब्रोकोली! स्टार्टर म्हणून खा किंवा भाजी म्हणून खा, चव अशी भारी की बोटं चाटत बसाल

६. रोज केलेल्या भाज्या, आमटी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे कटोरे, भांडी वापरू नका. तो सेटही एकसारखा ठेवा. ते दिसायला छान आणि टापटीप वाटते.

७. ट्रे,  चमचे, मसाल्यांचा डबा, चमचा ठेवण्याचे स्टॅण्ड, चहा- साखरेचे डबे या प्रत्येक गोष्टीत आजकाल खूप नवनवे प्रकार मिळतात. शिवाय त्यांची किंमतही जास्त नसते. हळूहळू करत हे सगळे जुने सामान बदलून टाका आणि तिथे नव्या वस्तू घ्या. घराचा लूक बदलून जाईल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Modernize Your Kitchen: 7 Simple Changes for a Tidy Look

Web Summary : Give your old kitchen a modern makeover with these budget-friendly tips. Replace plastic with ceramic or glass, use matching containers, and invest in organizers. Cover appliances and ensure uniform serving ware for a neat, stylish kitchen transformation.
टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स