Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुळे खायचे की दाखवायचे! पाहा दुबईच्या तरुणीचे लांबलचक Vampire Teeth, नकली दात लावून घेण्याचा खतरनाक ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:17 IST

Temporary Vampire Teeth: तुम्ही कधी एखाद्या डेंटिस्टला फेक व्हॅम्पायर दात बनवताना पाहिलं आहे का? सध्या इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Temporary Vampire Teeth: साधारणपणे लोक दातांची सड, हिरड्यांची सूज, पायरिया किंवा इतर समस्यांसाठीच डेंटिस्टकडे जातात. पण तुम्ही कधी एखाद्या डेंटिस्टला फेक व्हॅम्पायर दात बनवताना पाहिलं आहे का? सध्या इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर अपर्णा धरमन यांनी आपले पती आणि डेंटिस्ट डॉक्टर नितीन कुम्बला यांच्याकडून टेम्पररी व्हॅम्पायर दात लावून घेतल्याचं दाखवलं आहे. अवघ्या 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी संपूर्ण ट्रीटमेंटचे स्टेप्स शेअर केले असून कॅप्शनमध्ये “Warning: May Bite” असं मजेशीर लिहिलं आहे.

व्हॅम्पायर दात लावणं सुरक्षित आहे का?

व्हॅम्पायर दात दिसायला जरी वेगळे आणि मजेशीर वाटत असले, तरी ते दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. खासकरून जर तुम्ही हे दात घरीच DIY पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला, तर चुकीचं साहित्य किंवा गोंद वापरल्यामुळे दातांच्या इनॅमलवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे दातांसोबतच हिरड्यांनाही इजा होऊ शकते. जेवढा हा ट्रेंड दिसायला मजेशीर आहे, तेवढाच तो ओरल हेल्थसाठी धोकादायकही ठरू शकतो.

व्हॅम्पायर दात लावताना कोणत्या गोष्टी वापरू नयेत?

कोणताही गोंद किंवा ग्लू वापरू नये. यामुळे दातांना कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं.

लाकडी काडी किंवा टूथपिक वापरल्यास हिरड्यांना जखम होऊ शकते आणि त्या कापल्या जाऊ शकतात.

लिंबू किंवा बेकिंग सोडा यांचा वापर केल्यास दातांच्या इनॅमलवर परिणाम होतो आणि दातांची मजबुती कमी होऊ शकते.

एकंदरीत, सोशल मीडियावर दिसणारे ट्रेंड फॉलो करताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. दातांची आणि हिरड्यांची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण एकदा नुकसान झालं तर ते भरून काढणं कठीण ठरू शकतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Dubai Trend: Vampire Teeth are the New Dangerous Dental Fashion

Web Summary : A Dubai trend of temporary vampire teeth is gaining popularity, but dentists warn against DIY attempts. Incorrect materials can harm enamel and gums. Avoid glue, toothpicks, lemon, and baking soda to protect your oral health. Prioritize dental care over fleeting trends.
टॅग्स :सोशल व्हायरलब्यूटी टिप्स