सध्या अनेक शहरी घरांमध्ये कबूतरांचा वाढता वावर ही एक मोठी समस्या बनली आहे. गॅलरी, खिडकीमध्ये वारंवार येऊन विष्ठा टाकणे, घरटे बांधणे आणि दिवसभर उच्छाद मांडणे यामुळे केवळ जागा अस्वच्छ होत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक धोके निर्माण होतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारी घाण, दुर्गंधी आणि सातत्याने येणारा आवाज यामुळे घरातील शांतता भंग होते. घराच्या गॅलरीत कबुतरांचा उच्छाद हा अनेकांच्या डोकेदुखीचा विषय झाला आहे. जागोजागी विष्ठा टाकून घाण करणे यामुळे घरात दुर्गंधी पसरतेच, शिवाय आरोग्यासाठी हानिकारक जंतुसंसर्ग होण्याचीही शक्यता वाढते(Get rid of kabootar from balcony).
विशेषतः लहान मुले आणि वृद्ध असतील तर ही समस्या अधिक त्रासदायक ठरते. असा हा कबुतरांचा उच्छाद घालण्याच्या त्रासातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कबुतरांना इजा न करता, फक्त घरगुती उपायांनी त्यांना घर किंवा गॅलरीपासून दूर ठेवणे पूर्णपणे शक्य आहे. कबुतरांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता, त्यांना कायमस्वरूपी आपल्या घर किंवा गॅलरीतून पळवून लावण्यासाठी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोपे असे (How to get rid of pigeons using trick) काही घरगुती उपाय आणि युक्त्या पाहूयात...
कबुतरांचा उच्छाद नकोसा वाटतो मग करा ३ सोपे उपाय...
सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर पूनम देवनानी यांनी बाल्कनी आणि घराच्या आजूबाजूला सतत वावरणाऱ्या कबुतरांना पळवून लावण्यासाठी ३ जबरदस्त आणि बजेट-फ्रेंडली, खिशाल परवडतील असे सोपे उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे कबूतर घराच्या आसपासही फिरकत नाहीत.
१. जुन्या सीडीचा (CD) वापर :- कबुतरांना पळवून लावण्याचा सर्वात सोपा आणि असरदार उपाय म्हणजे जुन्या सी.डीचा वापर करणे. जेव्हा सीडी (CD) बाल्कनी किंवा खिडकीवर टांगली जाते, तेव्हा त्यावर सूर्यप्रकाश पडतो आणि अनेक दिशांना तिच्या चकचकीत पृष्ठभागामुळे तीव्र चमक निर्माण होते. या तीव्र आणि सतत पडणाऱ्या प्रकाशामुळे कबुतरांच्या डोळ्यांना त्रास होतो आणि ते या प्रकाशाला घाबरतात आणि घराच्या बाल्कनीत किंवा गॅलरीत पुन्हा फिरकत देखील नाहीत. तुम्ही सीडी अशा प्रकारे धाग्याने लटकवा की त्या हवेत सहजपणे फिरू शकतील.
जेवणानंतर खाल्ली जाणारी चिमूटभर बडीशेपही करेल वेटलॉस! खाण्याची योग्य पद्धत पाहा - वजनात दिसेल घट...
सकाळी पोट साफ होत नाही? चहाऐवजी प्या ‘हे’ ५ हर्बल टी, पोट साफ-दिवसभर वाटेल फ्रेश...
२. अॅल्युमिनियम फॉईल पेपरची चमक :- जर तुमच्याकडे जुन्या सीडी (CD) उपलब्ध नसतील, तर पूनम देवनानी यांनि सांगितलेल्या ट्रिकनुसार तुम्ही अॅल्युमिनियम फॉईल पेपरचा वापर करू शकता. तुम्ही स्वयंपाकघरात वापरला जाणारा अॅल्युमिनियम फॉईल पेपर घेऊन त्याच्या लांब लांब पट्ट्या कापू शकता किंवा त्याचे गोळे बनवून लटकवू शकता. अॅल्युमिनियम फॉईलची चमक देखील सीडीसारखीच असते आणि हवेत हलल्यावर ती वेगाने प्रकाश पसरवते. कबुतरांना पळवून लावण्यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त ठरेल.
किलोभर मटार सोला झटपट! ३ ट्रिक्स-मटार सोलायचे किचकट काम करा काही मिनिटांत पटपट...
३. काळ्या रंगाची प्लॅटिस्कची पिशवी :- पूनम देवनानी यांची सर्वात कमाल आणि स्मार्ट युक्ती म्हणजे काळ्या पॉलिथिनला कावळ्याप्रमाणे दाखवून कबूतरांना पळवून लावणे. कबुतर मुळात कावळ्याला खूप घाबरतात, कारण कावळा अनेकदा त्यांना किंवा त्यांच्या अंड्यांना नुकसान पोहोचवतो. त्यामुळे, तुम्ही एक काळी पॉलिथिनची पिशवी घ्या आणि तिच्या आत काही कागदाचे तुकडे किंवा हलक्या वस्तू भरा. त्यानंतर पॉलिथिन वरून घट्ट बांधा. जेव्हा ही काळी, गोल-मटोल पॉलिथिन हवेत लटकवली जाते आणि हलकीशी डोलते, तेव्हा ती दूरून कावळ्यासारखी दिसते. कबूतर या काळ्या वस्तूला आपला शिकारी किंवा धोका मानून त्या जागेवर कधीही बसणार नाहीत.
कबुतरांना पळवून लावण्यासाठी या तिन्ही उपायांचा स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे वापर केल्यास तुम्हांला नक्कीच याचा उपयोग होऊ शकतो. सर्वात खास गोष्ट म्हणजे, जर बाल्कनीमध्ये सीडी एका विशिष्ट पॅटर्नमध्ये लटकवल्या, तर बाल्कनीचा लूक देखील चांगला दिसतो. तुम्ही बाल्कनीच्या एका कोपऱ्यात सीडी आणि दुसऱ्या कोपऱ्यात काळी पॉलिथिन पिशवी लटकवू शकता. अशाप्रकारे आपण घरातील काही वस्तूंच्या मदतीने गॅलरीत, खिडकीत येऊन त्रास देणाऱ्या कबुतरांना पळवून लावू शकतो.
