Join us

बाल्कनीत घाण करणाऱ्या कबुतरांना कायमचं पळवण्याचा उपाय, पुन्हा होणार नाही त्यांचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:03 IST

How to get rid of pigeons : तुम्ही सुद्धा कबुतरांना वैतागले असाल तर आम्ही तुम्हाला त्यांना पळवून लावण्यासाठी एक जुना उपाय सांगणार आहोत.

How to get rid of pigeons : घराच्या बाल्कनीत कबूतरं येऊन घाणं करण्याला भरपूर लोक वैतागलेले असतात. एकतर यानं बालक्नी खराब होते, दुसरं म्हणजे कबुतरांच्या घाणीमुळे श्वासासंबंधी गंभीर आजाराचा धोकाही वाढतो. इतकंच नाही तर लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही घाणं नुकसानकारक असते. कबुतरांच्या या घाणीमुळे ना बाल्कनीत कपडे वाळत टाकायला मिळतात, ना शांतपणे बसायला मिळत. 

पक्ष्यांवर प्रेम वगैरे सगळं ठीक आहे. पण कबुतरांच्या घाणीच्या वासामुळे लोकांचं जगणं अवघड झालं आहे. तुम्ही सुद्धा कबुतरांना वैतागले असाल तर आम्ही तुम्हाला त्यांना पळवून लावण्यासाठी एक जुना उपाय सांगणार आहोत. एका यूट्यूब चॅनलवर कबुतरांना पळवून लावण्यासाठी उपाय सांगितला आहे. त्यासोबतच काही इतरही उपाय जाणून घेऊ.

इंडियन बॉय नावाच्या यूट्यूब चॅनलवर कबूतरं पळवून लावण्याचा उपाय सांगण्यात आला आहे. जो करण्यासाठी तुम्हाला बाजारातून एक नकली रबरचा साप खरेदी करायचा आहे. आता हा नकली रबरी साप खिडकी किंवा बाल्कनीमध्ये कबूतरं येतात त्या ठिकाणी ठेवा. व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, सापाला पाहून कबूतरं पळून जातात आणि पुन्हा दिसणारही नाहीत.  

बघा उपाय

चमकदार वस्तूंना घाबरतात कबूतर

कबूतरं चमकदार वस्तूंना देखील घाबरतात. कारण यानं त्यांच्या डोळ्यांवर अधिक प्रकाश पडतो. अशात तुम्ही जुनी सीडी किंवा अॅल्यूमिनिअम फॉइलचे तुकडे किंवा चमकदार प्लास्टिक खिडकी किंवा बाल्कनीत ठेवा. हवा आल्यावर या गोष्टी हलतात आणि चमकतात. ज्या बघून कबूतरं पळून जातात.

पाणी शिंपडत रहा

कबुतरांना आराम करतेवेळी त्याजागी पाणी असणं अजिबात आवडत नाही. कबूरतं बसतात त्या ठिकाणी रोज पाणी टाकाल तर ते पळून जातील. कबुतरांना एकाच ठिकाणी परत येण्याची सवय असते. ते त्यांची जागा विसरत नाही. अशात त्या ठिकाणी टाकलं तर त्यांचे जुने निशाण मिटतील.

लसूण, काळी मिरीचा गंध

कबुतरांची गंध घेण्याची शक्ती खूप स्ट्रॉंग असते. अशात लसूण, काळी मिरी आणि लाल मिरची पावडर पाण्यात टाकून स्प्रे तयार करा. हवं तर त्यात तुम्ही नेफथलीन बॉल्स म्हणजे फिनाइलच्या गोळ्यांचे तुकडेही टाकू शकता. या स्प्रे च्या गंधानं कबूतरं पळून जातील.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स