घरात उंदीर शिरणं (Mice at Home) ही एक सामान्य समस्या झाली आहे. ज्यामुळे फक्त घरात अस्वच्छता होत नाही तर आजारपणही येतं आणि भितीचं वातावरण पसरतं. खाण्यापिण्याचे पदार्थही खराब होतात. महागडे कपडेसुद्धा उंदीर कुरतडतात. घरातलं सामान खराब करून नुकसानही करू शकता (How to Get Rid of Mice at Home). यापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स समजून घेऊ. युट्युबर अविका रावत यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. या उपायानं फक्त उंदीर पळत नाही तर बाकीचे किटकही दूर होतात. कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता उंदीर घरातून बाहेर जातील. (How To Get Rid Of Mice According To Experts)
सगळ्यात आधी मिश्रण तयार करा
जुनं भांड, दीड चमचा गव्हाचं पीठ, एक चमचा तिखट लाल मिरची, एक रूपयांचा शॅम्पूचा पाऊच, जुना रूमाल, कापराच्या गोळ्या हे साहित्य तुम्हाला लागेल. सगळ्यात आधी एक जुना बाऊल घ्या. यात गव्हाचं पीठ आणि लाल तिखट घाला. तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता पण मिरची तिखट असायला हवी. हे दोन्ही पावडरमध्ये पाणी घालून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्या. डोश्याच्या पिठाप्रमाणे सरसरीत बॅटर हवं.
शॅम्पू आणि कापूराचा वापर
हे बॅटर तयार करण्यासाठी १ रूपयाचा शॅम्पू कापूरात पूर्ण मिसळा. नंतर रुमाल पसरवून त्यावर ब्रशच्या मदतीनं बॅटर लावून घ्या. कारण कापराचा सुंगध उंदरांना अजिबात आवडत नाही. या उपायानं उंदरांना दूर पळवण्यास मदत होईल. हा रूमाल ज्या ठिकाणाहून उंदीर घरात प्रवेश करतात त्या ठिकाणी ठेवा. लाल मिरची, शॅम्पू आणि कापराचा वास उंदरांना अजिबात आवडत नाही. उंदरांना पळवण्यासाठी तुम्ही हे सोपे उपाय करू शकता. या उपायानं उंदरं मरत नाहीत तर घरातून दूर पळतात. याशिवाय घराच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्या. अस्वच्छ ठिकाणी जास्त प्रमाणात उंदरं येतात. जास्त कचरा जमा होऊ देऊ नका.
घरात स्वच्छता ठेवा
रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील सर्व खाद्यपदार्थ झाकून ठेवा. डस्टबिनमध्ये कचरा साचू देऊ नका आणि कचरा रोज बाहेर टाका. घराच्या आत किंवा बाहेर अन्नकण, सांडलेले पदार्थ आणि साचलेले पाणी त्वरित साफ करा. धान्याचे डबे व्यवस्थित बंद आहेत का, याची खात्री करा. घराच्या भिंतींमधील लहान छिद्र किंवा भेगा सिमेंट किंवा धातूच्या जाळीने बंद करा. खिडक्या आणि दारांच्या खाली असलेल्या जागा तपासा आणि आवश्यक असल्यास त्या दुरुस्त करा. पाइप्सच्या सभोवतालच्या जागा तपासा आणि त्याही बंद करा