Join us

घरभर फिरणाऱ्या पालींना वैतागलात? करा 'हा' एक देशी उपाय, फक्त ५ रूपये येईल खर्च...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:52 IST

How to get rid of lizard : साधारपणे पाली पळवून लावण्यासाठी लोक केमिकलयुक्त लिक्विडचा वापर करतात. हे महागडे तर असतात, सोबतच आरोग्यासाठी घातकही असतात.

How to get rid of lizard : पावसाळ्यात घरात कीटक, डास, चिलटं यांच्यासोबतच पालींचा त्रासही खूप वाढतो. पाली घरभर फिरतात आणि त्यांची पिलावळंही सगळीकडे दिसतात. तुम्ही सुद्धा पालींना वैतागले असाल तर केवळ पाच रूपये खर्च करून त्यांना घरातून पळवून लावू शकता. काही गोष्टींचं एक मिश्रण तयार करून घरात जर शिंपडलं तर पाली पुन्हा घरात पायही ठेवणार नाहीत.

साधारपणे पाली पळवून लावण्यासाठी लोक केमिकलयुक्त लिक्विडचा वापर करतात. हे महागडे तर असतात, सोबतच आरोग्यासाठी घातकही असतात. अशात तुम्ही घरीच एक खास मिश्रण तयार करून सुरक्षितपणे पालींना घराबाहेर घालवू शकता. 

पालींना पळवण्याचा उपाय

पालींना पळवून लावण्याचं मिश्रण तयार करण्यासाठी दुकानातून दोन रूपयांची कॉफी पावडर आणि तीन रूपयांचा तंबाखू आणा. एका वाट्यात कॉफी आण तंबाखूचं मिश्रण पाणी टाकून तयार करा. या गोष्टी चमच्यानं फिरवून चांगल्या मिक्स करा. थोड्या वेळासाठी हे मिश्रण तसंच ठेवा. 

थोड्या वेळानं हे मिश्रण एखा स्प्रे बॉटलमध्ये भरा. ज्या ज्या ठिकाणी पाली फिरतात तिथे हे मिश्रण स्प्रे करा. या मिश्रणाचा वास येताच पाली घरातून पळून जातील.

कॉफी आणि तंबाखूच्या या मिश्रणाचा गंध भरपूर तिखट असतो. जो पालींना विषासारखा वाटतो. अशात जेव्हा पानी या मिश्रणाच्या संपर्कात येतात, त्यांना अस्वस्थ वाटतं आणि त्या पळून जातात. पालींना पळवून लावण्यासाठी हा उपाय रामबाण ठरू शकतो.

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी