Join us

घरात पालींचा सुळसुळाट? घाबरू नका, चुकचुकणाऱ्या पालींचा करा बंदोबस्त, ३ उपाय ताबडतोब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2024 16:33 IST

How to Get Rid of Lizards at Home Without Killing Them? 3 remedies : केमिकल उत्पादने कशाला हवेत, ३ सोपे उपाय करा, पाल होतील गायब-त्रासच नाही..

हिवाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत झुरळं आणि पाली (Lizard) घरात थैमान घालतात. घरात पाल दिसताच लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण भीतीने किंचाळतो. कधी कधी पालींचे लहान पिल्ले आपल्या कपड्यांच्या आत शिरतात. अशावेळी ती काढायची कशी असा प्रश्न निर्माण होतो. पाली घरात कुठेही फिरतात.

अन्न आणि भांड्यांवरही फिरतात. ज्यामुळे आपल्या आरोग्यावरही धोका निर्माण होऊ शकतो. यासह फूड पॉयझनिंगचाही धोका वाढतो (Cleaning Tips). त्यामुळे जर घरात पाल शिरली असेल, व तिला घरातून पळवून लावायचं असेल तर, ३ उपाय करून पाहा. या ३ उपायांमुळे घरातून पाली पळून जातीलच शिवाय पुन्हा घराजवळ फिरकणार नाही(How to Get Rid of Lizards at Home Without Killing Them? 3 remedies).

पेपर स्प्रे

पालींना पळवून लावण्यासाठी आपण पेपर स्प्रेचा वापर करू शकता. काळी मिरीच्या उग्र गंधामुळे पाली घरातून पळून जातील, शिवाय पुन्हा घराबाहेर फिरकणार नाही. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. तयार स्प्रे ज्याठिकाणी पाली फिरतात, त्या ठिकाणी शिंपडा. कारण पाली एकाच जागेवर फिरत नाही, त्या घरभर फिरतात. पेपर स्प्रेमुळे पाली घरातून नक्कीच पळ काढतील.

खिडकीत-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? ३ भन्नाट टिप्स; कबुतरं खिडकीजवळही फिरकणार नाहीत

कांदा-लसूण

पालींना पळवून लावण्यासाठी आपण कांदा-लसणाचा वापर करू शकता. कांदा आणि लसणाचा गंध हा तीव्र असतो, ज्यामुळे पाली घरातून पळ काढतात. ज्या ठिकाणी पाली वारंवार फिरत असतील, त्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या आणि कांद्याच्या फोडी ठेवा. यामुळे पाली घरातून पळून जातील.

लायटरवर चिकट डाग पडलेत, मेणचट झाले? ३ घरगुती सोपे उपाय-पाणी न लावता लायटर चकाचक

डांबरगोळी

डांबर गोळीला नॅपथॅलीन बॉल किंवा मॉथ बॉल असेही म्हणतात. डांबर गोळी हे रासायनिक कीटकनाशके आणि दुर्गंधीनाशकांचे लहान गोळे असतात. याच्या गंधामुळे कीटक पळून जातात. ज्या ठिकाणी पालींचा जास्त वावर असेल त्या ठिकाणी २ ते ३ डांबर गोळ्या ठेवा. नॅप्थालीनच्या तीव्र वासामुळे पाली पुन्हा घरात येणार नाही.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल