उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी घरोघरी वर्षभराचं धान्य भरून ठेवण्याची लगबग सुरू असते. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ अशी जास्त प्रमाणात लागणारी धान्यं अनेक घरांमध्ये एकदम घेतली जातात. जेणेकरून ती जरा स्वस्तही पडतात. धान्य भरून ठेवताना त्याला थोडं ऊन देऊन ते भरावं लागतं. पण यावर्षी मात्र ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावली आणि अनेक घरांमध्ये धान्याला ऊन देणं राहूनच गेेलं. त्यामुळेच मग अगदी पावसाला सुरुवात होताच काही ठिकाणी धान्याला किडे लागल्याचं दिसून येत आहे (how to store wheat for long?). वर्षभरासाठी भरून ठेवलेल्या धान्याचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर अगदी लगेचच काही उपाय ताबडतोब केले पाहिजेत (proper method for the storage of wheat). ते उपाय नेमके कोणते ते पाहा..(how to get rid of insects and bugs in wheat?)
गव्हाला किडे, अळ्या झाल्या असतील तर काय करावे?
१. गव्हाला जर किडे किंवा अळ्या झाल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं तर सगळ्यात आधी कोठीमध्ये भरलेले गहू बाहेर काढा एका चादरीवर पसरवून ठेवा आणि नंतर ते पुन्हा चाळून, निवडून घ्या.
पाठीवर सारखे फोडं, पुरळ येऊन त्यांना खाज येते? बघा त्यामागची कारणं आणि ३ सोपे उपाय
पण बाहेर पाऊस चालू असेल तर हे काम करू नका. पाऊस ज्या दिवशी नसेल त्यादिवशीच हे काम काढा. कोठी पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून पुसून कोरडी करून घ्या आणि मगच तिच्यामध्ये गहू भरा.
२. गहू भरताना सगळ्यात खाली कडुलिंबाचा वाळलेला पाला घाला आणि त्यावर गहू भरा. याशिवाय थोडे थोडे गहू भरल्यानंतर त्यावर कडुलिंबाच्या पानांचा थरही द्या. यामुळे गव्हामध्ये पुन्हा किडे होणार नाहीत.
गुलाबी साडी आणि... आलिया भटच्या 'सिलसिला' लूकमधलं पिंक ब्लाऊज डिझाईन जबरदस्त व्हायरल
३. गहू भरताना त्यामध्ये ठिकठिकाणी लवंग, तेजपान टाकून ठेवा. त्यांच्या उग्र वासानेही गव्हामध्ये किडे होण्याचा धोका बराच कमी होतो.
४. एक पेपर नॅपकिन घ्या. त्यामध्ये अख्खा लसूण घाला आणि त्या नॅपकिनची गुंडाळी करून ती गव्हाच्या डब्यामध्ये ठेवा. असे ५ ते ६ लसूण ठेवा. लसूणामुळेही गव्हाला पुन्हा किड लागणार नाही.