Join us
Daily Top 2Weekly Top 5

धुतल्यानंतर काळ्या कपड्यांवर पांढरे डाग पडतात, ‘या’ सोप्या गोष्टी करा काळे कपडे कायम दिसतील नवेकोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:22 IST

Stain on black clothes Cleaning Tips : जर आपल्याला सुद्धा असा अनुभव नेहमीच येत असेल, तर ही माहिती आपल्यासाठी उपयोगी ठरू शकते. चला जाणून घेऊया असे का होते आणि हे डाग कसे दूर करता येतील.

Stain on black clothes Cleaning Tips : काळे कपडे स्टायलिश दिसतात, पण त्यांना धुणे म्हणजे फारच डोकेदुखीचं काम असतं. अनेकदा धुतल्यानंतरही त्यांवर पांढरे सर्फचे डाग राहतात, ज्यामुळे कपड्यांची चमक कमी होते. नंतर हे डाग काढणे आणखी कठीण. जर आपल्याला सुद्धा असा अनुभव नेहमीच येत असेल, तर ही माहिती आपल्यासाठी उपयोगी ठरू शकते. चला जाणून घेऊया असे का होते आणि हे डाग कसे दूर करता येतील.

काळ्या कपड्यांवर सर्फचे डाग का राहतात?

१. जास्त सर्फ वापरणे

अनेक लोकांना वाटते की जास्त सर्फ घातले म्हणजे कपडे अधिक स्वच्छ होतात, पण असं काही नसतं. जास्त डिटर्जंट पाण्यात नीट विरघळत नाही आणि कपड्यांवर साचून राहतं. खासकरून काळ्या आणि गडद रंगाच्या कपड्यांवर हे पांढरे डाग ठळक दिसतात.

२. खूप वेळ भिजत ठेवणे

काळे कपडे सर्फच्या पाण्यात जास्त वेळ भिजत ठेवल्यास त्याचा रंग फिक्कट होतो आणि न विरघळलेली पावडर कपड्यांवर चिकटते. त्यामुळे धुतल्यानंतरही कपड्यांवर पांढरे डाग दिसतात.

४. वॉशिंग मशीनमध्ये ओव्हरलोडिंग

मशीनमध्ये खूप कपडे घातल्यास पाणी आणि डिटर्जंटचे योग्य सर्क्युलेशन होत नाही. कपडे नीट स्वच्छ किंवा रिंस होत नाहीत आणि सर्फचे डाग तसेच राहतात.

५. हार्ड वॉटर

काही भागात पाणी जड असतं, ज्यात खनिजं जास्त असतात. अशा पाण्यात डिटर्जंट नीट विरघळत नाही किंवा फेस तयार होत नाही. त्यामुळे कपड्यांवर पांढरे डाग दिसतात.

सर्फचे डाग राहिले तर काय करावे?

१. कपडे पुन्हा स्वच्छ पाण्यात रिंस करा

कपडे साध्या पाण्यात २–३ वेळा धुवा. अनेकदा केवळ योग्य प्रकारे रिंस केल्यानेही डाग निघून जातात.

२. व्हिनेगर वापरा

एक बादली पाण्यात १ कप व्हाइट व्हिनेगर मिसळा आणि पांढरे डाग असलेले काळे कपडे १० मिनिटे भिजवा. व्हाइट व्हिनेगरने डिटर्जंटचे तत्व विरघळतात आणि कपडा पुन्हा स्वच्छ दिसतो.

३. लिक्विड डिटर्जंट वापरा

लिक्विड डिटर्जंट लगेच पाण्यात मिसळतं आणि पावडरप्रमाणे डाग सोडत नाही. काळ्या कपड्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

४. वॉशिंग मशीनमध्ये ‘एक्स्ट्रा रिंस’ वापरा

आजकाल मशीनमध्ये 'एक्स्ट्रा रिंस' ऑप्शन असतो. याचा वापर केल्याने सर्फ पूर्णपणे निघून जातं.

५. मऊ ब्रशने साफ करा

जर डाग एखाद्या विशिष्ट ठिकाणी असेल, तर त्या भागाला हलक्या ओल्या ब्रशने साफ करा आणि नंतर पाण्याने धुवा.

या उपायांनी तुम्ही काळ्या कपड्यांवरील सर्फचे डाग दूर करू शकता आणि भविष्यातही ते होण्यापासून बचाव करू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Remove White Detergent Stains from Black Clothes: Easy Cleaning Tips

Web Summary : Black clothes often retain white detergent stains after washing due to excess detergent, overloading the machine, or hard water. Re-rinsing, using vinegar, liquid detergent, or the machine's extra rinse option can remove these stains, keeping your blacks looking sharp.
टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीफॅशन