Lokmat Sakhi >Social Viral > किचन ट्रॉली, फ्रिजमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करून पाहा खास घरगुती उपाय - झुरळं पळतील घराबाहेर...

किचन ट्रॉली, फ्रिजमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करून पाहा खास घरगुती उपाय - झुरळं पळतील घराबाहेर...

How To Get Rid Of Cockroaches Using Naphthalene Balls White Dambar Goli : Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently : Effective Ways to Get Rid of Cockroaches : Get rid of cockroaches in kitchen : किचन ट्रॉली, फ्रिजमधील झुरळांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नैसर्गिक उपाय करणेच फायदेशीर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 22:38 IST2025-05-01T19:50:06+5:302025-05-01T22:38:25+5:30

How To Get Rid Of Cockroaches Using Naphthalene Balls White Dambar Goli : Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently : Effective Ways to Get Rid of Cockroaches : Get rid of cockroaches in kitchen : किचन ट्रॉली, फ्रिजमधील झुरळांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नैसर्गिक उपाय करणेच फायदेशीर..

How To Get Rid Of Cockroaches Using Naphthalene Balls White Dambar Goli Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently Effective Ways to Get Rid of Cockroaches Get rid of cockroaches in kitchen | किचन ट्रॉली, फ्रिजमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करून पाहा खास घरगुती उपाय - झुरळं पळतील घराबाहेर...

किचन ट्रॉली, फ्रिजमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करून पाहा खास घरगुती उपाय - झुरळं पळतील घराबाहेर...

घरातील काही भाग असे असतात की त्या ठिकाणी हमखास झुरळं असतातच, किचन ही त्यापैकीच एक महत्वाची जागा. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी किचनमधील झुरळांचा वावर (How To Get Rid Of Cockroaches Using Naphthalene Balls White Dambar Goli) बघून हैराण होतात. किचनमध्ये (Effective Ways to Get Rid of Cockroaches) स्वयंपाक करताना ही झुरळं सतत आपल्या पाया खालून फिरत असतात. ही झुरळं किचनमधील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसतात, कधी किचन ट्रॉली तर कधी थेट फ्रिजमध्ये देखील बारीक बारीक झुरळं होतात(Get rid of cockroaches in kitchen).

किचनमधून सतत इकडे - तिकडे फिरणारी झुरळं पाहून किळसवाणे वाटते. याचबरोबर, किचनमधील किचन ट्रॉली आणि फ्रिज अशी ठिकाणी आहेत जिथे आपण रोजच्या वापरातील भांडी आणि खायचे पदार्थ स्टोअर करून ठेवतो, त्यामुळे अशा भागात झुरळं असतील तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक ठरू शकते. यासाठीच, किचन ट्रॉली आणि फ्रिजमधील झुरळांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नैसर्गिक उपाय करणेच फायदेशीर ठरते. यासाठी, किचन ट्रॉली आणि फ्रिजमधील बारीक झुरळं घालवण्यासाठी आपण नेमका कोणता घरगुती उपाय करू शकतो, ते पाहूयात.   

साहित्य :- 

१. कापूराच्या वड्या - १० ते १२ वड्या
२. गूळ - २ ते ३ टेबलस्पून 
३. डांबर गोळ्या - ५ ते ६ गोळ्या
४. बोरीक पावडर - १ टेबलस्पून
५. फ्लोअर क्लिनर - १ टेबलस्पून 
६. कापसाचे बोळे - गरजेनुसार

मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय...


एरंडेल तेल करेल जादू! पोटाच्या तक्रारीपासून - त्वचेपर्यंत अनेक समस्यांवर असरदार - तेल १ फायदे अनेक...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी एक वापरात नसलेलं भांड घेऊन त्यात कापूराच्या वड्या, डांबर गोळ्या आणि किसलेला गूळ घ्यावा. आता हे सगळे जिन्नस कुटून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. 
२. आता ही तयार पावडर एका बाऊलमध्ये घेऊन त्यात बोरीक पावडर आणि नेहमीच्या वापरातले फ्लोअर क्लिनर घालून मिश्रण थोडे पातळ करून घ्यावे. 
३. या पातळ मिश्रणांत लहान लहान कापसाचे बोळे भिजवून ओले करून घ्यावेत. 

काळे की पांढरे? वजन कमी करण्यासाठी कोणते चिया सीड्स आहेत खास - वेटलॉस होईल भरभर...

या कापसाच्या बोळ्यांचं नेमकं करायचं काय ? 

तयार मिश्रणात कापसाचे बोळे भिजवून घेतल्यानंतर, हे कापसाचे बोळे ज्या भागात झुरळ आहेत त्या भागात ठेवून द्यावेत. आपण हे कापसाचे बोळे किचन ट्रॉली किंवा फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता. परंतु किचन ट्रॉली आणि फ्रिजमध्ये हे कापसाचे बोळे ठेवण्यापूर्वी किचन ट्रॉली आणि फ्रिजमधील सर्व वस्तू बाहेर काढून घ्याव्यात. तसेच हे कापसाचे बोळे काढल्यानंतर किचन ट्रॉली आणि फ्रिज संपूर्णपणे स्वच्छ केल्याशिवाय त्यात वस्तू किंवा खाण्याचे पदार्थ ठेवू नयेत. अशाप्रकारे आपण महागडे स्प्रे, गोळ्या, औषधांशिवाय देखील किचन ट्रॉली आणि फ्रिजमधील झुरळांचे प्रमाण कमी करू शकतो.

Web Title: How To Get Rid Of Cockroaches Using Naphthalene Balls White Dambar Goli Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently Effective Ways to Get Rid of Cockroaches Get rid of cockroaches in kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.