Lokmat Sakhi >Social Viral > किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं घरभर येतात? वापरा 'हा' होममेड स्प्रे - खिशाला परवडणारा असरदार उपाय...

किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं घरभर येतात? वापरा 'हा' होममेड स्प्रे - खिशाला परवडणारा असरदार उपाय...

How To Get Rid Of Cockroaches In Kitchen Sink Jali By Homemade Spray : Home Remedies for Cockroaches Control in Kitchen : Get rid of cockroaches from kitchen permanently : best homemade spray to kill cockroaches : किचन सिंकमधून येणाऱ्या झुरळांचा आणि कीटकांचा नायनाट करण्यासाठी खास घरगुती स्प्रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2025 23:02 IST2025-06-14T16:34:36+5:302025-06-14T23:02:05+5:30

How To Get Rid Of Cockroaches In Kitchen Sink Jali By Homemade Spray : Home Remedies for Cockroaches Control in Kitchen : Get rid of cockroaches from kitchen permanently : best homemade spray to kill cockroaches : किचन सिंकमधून येणाऱ्या झुरळांचा आणि कीटकांचा नायनाट करण्यासाठी खास घरगुती स्प्रे...

How To Get Rid Of Cockroaches In Kitchen Sink Jali By Homemade Spray Home Remedies for Cockroaches Control in Kitchen Get rid of cockroaches from kitchen permanently best homemade spray to kill cockroaches | किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं घरभर येतात? वापरा 'हा' होममेड स्प्रे - खिशाला परवडणारा असरदार उपाय...

किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं घरभर येतात? वापरा 'हा' होममेड स्प्रे - खिशाला परवडणारा असरदार उपाय...

घरातील स्वयंपाक घर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे अत्यंत आवश्यकच असते. स्वयंपाक घरात आपण अन्नपदार्थ तयार करतो यासाठी ती जागा वेळच्यावेळी स्वच्छ केलीच पाहिजे. स्वयंपाक घरातील सिंकचा (How To Get Rid Of Cockroaches In Kitchen Sink Jali By Homemade Spray) सर्वात जास्त वापर केला जातो. या सिंकमध्ये (Home Remedies for Cockroaches Control in Kitchen) आपण भाज्या साफ करण्यापासून ते भांडीकुंडी धुण्यापर्यंतची सगळे स्वच्छतेची कामे करतो. सिंकच्या अशा वारंवार वापरामुळे ते खराब होते शिवाय त्यातून कुबट दुर्गंधी देखील येऊ लागते. इतकेच (Get rid of cockroaches from kitchen permanently) नाही तर या सिंकच्या देखील स्वच्छतेची तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. स्वयंपाक घरातील सिंक अस्वच्छ असले तर ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरु शकते(best homemade spray to kill cockroaches).

स्वयंपाक घरातील अस्वच्छ सिंकमधून येणारी झुरळं आणि इतर कीटक, हळूहळू स्वयंपाकघरात वावरायला लागतात. स्वयंपाक घरातील झुरळं आणि कीटकांचा असा वावर स्वच्छतेत बाधा तर आणतोच सोबतच आयोग्यासाठी देखील ते हानिकारक ठरु शकते. सिंकमधील ओलावा, अन्नाचे उरलेले कण आणि घाण यामुळे या झुरळांचा वावर वाढतो. ही झुरळं विविध प्रकारचे जंतू, बॅक्टेरिया आपल्या स्वयंपाकघरात पसरवतात त्यामुळे संपूर्ण घराला आजारपण येऊ शकत. यासाठीच, वेळीच किचनसिंकमधून येणाऱ्या झुरळांचा आणि कीटकांचा बंदोबस्त करावा लागतो. किचन सिंकमधून येणाऱ्या झुरळांचा आणि कीटकांचा नायनाट करण्यासाठी घरगुती स्प्रे कसा तयार करायचा ते पाहूयात. 

झुरळ व इतर कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी घरगुती स्प्रे... 

 किचनसिंक मधील झुरळ व इतर कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी घरगुती स्प्रे तयार करण्यासाठी, चूना, कोल्ड ड्रिंक, व्हिनेगर, लिंबाच्या साली, काळीमिरी पूड, पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

पावसाळ्यात डास - चिलटं - माशांचा भणभणाट? पाहा लसणाचा असरदार उपाय- घर पावसाळ्यातही वाटेल फ्रेश...

घरगुती स्प्रे कसा तयार करायचा ? 

सगळ्यातआधी एका मोठ्या भांड्यात २ कप पाणी घेऊन त्यात ३ ते ४ टेबलस्पून चुना मिसळून घ्यावा. त्यानंतर या पाण्यांत १ कप व्हिनेगर घालावे. आता एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये लिंबाच्या साली घालून त्या मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट देखील त्या पाण्यांत मिसळून घ्यावी. सगळ्यात शेवटी या पाण्यांत १ टेबलस्पून काळीमिरी पूड आणि १ कप कोल्ड ड्रिंक घालावे. हे तयार मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. 

घरभर उंदरांचा उच्छाद? करा कणकेच्या पिठाचा सोपा घरगुती उपाय - उंदीर पळतील घराबाहेर...

याचा वापर कसा करावा ? 

रात्री किचनमधील सगळी काम झाल्यानंतर, हे तयार मिश्रण किचन सिंकच्या बरोबर मधोमध असणाऱ्या जाळीवर स्प्रे करावे. थोडे मिश्रण खालच्या पाईपमध्ये देखील जाईल याची खबरदारी घ्यावी. त्यानंतर संपूर्ण किचन सिंकमध्ये या द्रावणाची फवारणी करुन घ्यावी. रात्रभर हे मिश्रण सिंकमध्ये तसेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका पातेल्यात गरम पाणी करून ते पाणी सिंकमध्ये ओतून सिंक स्वच्छ धुवून घ्यावे.

हा साधासोपा घरगुती उपाय केल्यामुळे किचनसिंकच्या पाईपमधून येणाऱ्या झुरळं व कीटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास झुरळं पुन्हा तुमच्या सिंकमध्ये फिरकणार देखील नाहीत. महागड्या क्लिनर्स किंवा स्प्रे वर पैसे खर्च करण्यापेक्षा हा घरगुती स्वस्तात मस्त पण असरदार उपाय अगदी फायदेशीर ठरतो.

Web Title: How To Get Rid Of Cockroaches In Kitchen Sink Jali By Homemade Spray Home Remedies for Cockroaches Control in Kitchen Get rid of cockroaches from kitchen permanently best homemade spray to kill cockroaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.