Join us

घरात झुरळ, मुंग्या वाढण्याचं 'हे' आहे छुपं कारण- स्वयंपाकघर आवरताना ४ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 15:18 IST

How To Get Rid Of Cockroaches And Ants In Kitchen: घर अगदी स्वच्छ ठेवूनही आपल्या घरात मुंग्या, झुरळं का होतात हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर त्यामागचं हे कारण वाचा...(home hacks to reduce cockroaches and red ants in kitchen)

ठळक मुद्देस्वयंपाक घराची स्वच्छता करताना बहुसंख्य महिलांकडून काही जागा स्वच्छ करणं नकळतपणे राहून जातं आणि त्यामुळेच स्वयंपाक घरातल्या मुंग्या आणि झुरळं काही केल्या कमी होत  नाहीत.

स्वयंपाक घर ही आपल्या घरातली अशी एक जागा असते जिथून सगळ्या घराचं आरोग्य जपलं जातं. त्यामुळे स्वयंपाक घर नेहमीच स्वच्छ, टापटीप असायला हवं. एकवेळ घरातल्या इतर खोल्यांमध्ये थोडाफार पसारा असेल तर चालेल. पण स्वयंपाक घराच्या बाबतीत मात्र अस्वच्छतेला थाेडाही थारा नको. बऱ्याच घरांमध्ये आपण पाहातो की झुरळं, मुंग्या खूप जास्त वाढलेल्या असतात. आपण तर गॅस, ओटा, डायनिंग टेबल असं सगळं अगदी स्वच्छ ठेवतो. दिवसातून दोनदा किचन झाडून घेतो. तरी मुंग्या, झुरळं का कमी होत नाहीत, असा प्रश्न तुम्हालाही नेहमीच पडत असेल तर ही काही त्यामागची कारणं बघा (how to get rid of cockroaches and ants in kitchen).. स्वयंपाक घराची स्वच्छता करताना बहुसंख्य महिलांकडून काही जागा स्वच्छ करणं नकळतपणे राहून जातं आणि त्यामुळेच स्वयंपाक घरातल्या मुंग्या आणि झुरळं काही केल्या कमी होत  नाहीत.(home hacks to reduce cockroaches and red ants in kitchen)

 

स्वयंपाक घरातल्या 'या' जागा तुम्ही किती दिवसांनी स्वच्छ करता?

१. स्वयंपाक घरातलं सिंक ही सगळ्यात जास्त घाण होणारी जागा आहे. आता आपण सिंक घासून ते स्वच्छ करतो. पण त्याच्या पाईपमध्ये अडकलेली घाण मात्र व्यवस्थित साफ होत नाही. तिथूनच बऱ्याचदा जंतू, झुरळांची निर्मिती होते. त्यामुळे सिंक ड्रेन क्लिनरचा उपयोग आठवड्यातून एकदा नक्की करा जेणेकरून सिंकचा पाईप आतून स्वच्छ होईल.

२. किचन ट्रॉलीच्या खालची फरशीही खूपदा स्वच्छ केली जात नाही. तिथे खूप कचरा, घाण असते. त्यामुळे १५ ते २० दिवसांतून एकदा ट्रॉली काढून फरशी स्वच्छ करायला हवी.

 

३. तिसरी जागा म्हणजे ट्रॉलींचा बाह्यभाग. ट्रॉलीच्या फर्निचरला खूपच खरकटा हात लागतो आणि ती अस्वच्छ होत जाते. त्यामुळे हा भाग सुद्धा आठवड्यातून एकदा पुसायलाच हवा.

४. सिंकखाली जी जागा असते ती जागा आपण फर्निचरचा दरवाजा लावून व्यवस्थित पॅक करून टाकलेली असते. पण ही जागा एक दिवसाआड तरी स्वच्छ व्हायलाच हवी. अनेक घरांमध्ये याजागेत खूप पसारा ठेवलेला असतो आणि ती खूपच क्वचित स्वच्छ केली जाते.

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी