शिमगा झाला आणि आता हळूहळू उन्हाळ्याची चाहुल लागायला सुरुवात झाली. वातावरणातला उकाडा वाढला आहे. दुपारीही चटका देणारं ऊन जाणवायला लागलं आहे. जसा ऋतू बदलतो तसेच काही बदल आपल्या अवतीभवतीही होऊ लागतात. त्यापैकीच एक म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत पालीची पिल्लं खूप घरभर फिरताना दिसतात. एरवी एखादी पाल घरात दिसत असली तरी उन्हाळ्यात मात्र तिच्या पिलांचा वावर घरभर दिसू लागतो (how to get rid of chipkali or lizards?). हे टाळायचं असेल आणि तुमच्या घरात पालीला फिरकूही द्यायचं नसेल तर आतापासूनच पुढे सांगितलेले काही उपाय करायला सुरुवात करा.(2 simple tricks to make our house lizard free)
घरात पाल येऊ नये म्हणून काही खास उपाय
१. कापुराचा सुगंध आपल्याला हवाहवासा वाटत असला तरी पालीला मात्र तो अजिबात आवडत नाही. त्यामुळे कापुराच्या मदतीने घरातून पालींना पळवून लावता येऊ शकते.
हा उपाय करण्यासाठी खिडकीच्या जवळ, दरवाज्याजवळ दिवसांतून एकदा तरी कापूर जाळा. यामुळे बाहेरून पाल तुमच्या घरात येणार नाही. शिवाय तुमच्या घरात ज्या ठिकाणी पाल जास्त प्रमाणात दिसून येते, अशा ठिकाणीही कापुराच्या गोळ्या ठेवा. पाली दिसण्याचं प्रमाण कमी होईल.
२. पालीला तुमच्या घरातून कायमचं बाहेर काढण्यासाठी कांदा, लसूण या पदार्थांचाही खूप चांगला उपयोग होतो. हा उपाय करण्यासाठी ८ ते १० लसूण पाकळ्या आणि १ मध्यम आकाराचा कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर पातळ कपड्याने गाळून त्याचा रस करा.
थुलथुलीत शरीर बदलेल रूप होईल सडपातळ- 'या' पद्धतीने रोज ब्लॅक कॉफी प्या, पाहा तुमचा मेकओव्हर
हा रस स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि आठवड्यातून एकदा पाली ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी तसेच खिडकी आणि दरवाज्यांच्या चौकटीवर शिंपडा. कांदा आणि लसूणमध्ये असणारे सल्फर पालीला दूर ठेवतात. या रसामध्ये तुम्ही थोडी मिरेपूडही घालू शकता. सल्फरच्या वासासोबतच मिऱ्यांचा तिखटपणा पालीसाठी आणखी जास्त त्रासदायक ठरतो.
