तब्येत चांगली ठेवण्यासाठी स्वत:ला हायड्रेट ठेवणं फार महत्तवाचं आहे. यासाठी वेळोवेळी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. घरात आपण माठातून ग्लासमध्ये घेऊन पाणी पित असलो तरी बाहेर मात्र बाटलीनेच पाणी प्यायलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी बॉटल्स बाजारात आल्या आहेत. (How To Get Rid Of Bottle Smell) कोणी स्टिलच्या बाटलीत पाणी तर कोणी तांब्याच्या भांड्यात पाणी पितं.
थोडे दिवस वापरल्यानंतर या बाटल्यांमधून दुर्गंध येतो. वारंवार धुवूनही दुर्गंध जात नाही. पाण्याची चवही खराब लागते. प्लास्टीक, स्टीलच्या बाटल्यांमधून दु्र्गंध येतो अशावेळी लोक नवीन बॉटल्स घेतात. जर पाण्याच्या बाटल्यांमधून दुर्गंध येत असेल तर काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही या दुर्गंधापासून सुटका मिळवू शकता. (How To Get Rid Of Bottle Smell Know Easy Kitchen Tips)
पाण्याच्या बाटल्यांमधून दुर्गंध का येतो?
पाण्याच्या बॉटलमधून दुर्गंध येण्याचं मुख्य कारण मॉईश्चर, अनेकदा आपण पूर्णपणे बॉटल सुकत नाही किंवा दीर्घकाळ त्यात पाणी भरलेलं राहू देतो. ज्यामुळे दुर्गंध येतो. बाटलीतून दुर्गंध हटवण्यसाठी १ चमचा सैंधव मीठ, एक मूठभर तांदूळ, १ लिंबू आणि थोडं गरम पाणी लागेल. हे सर्व पदार्थ तुम्हाला किचनमध्ये सहज मिळतील.
सगळ्यात आधी सैंधव मीठ घ्या लिंबाचा रस घाला. त्यात १ मूठ कच्चे तांदूळ घाला. नंतर गरम पाणी घालून व्यवस्थित एकजीव करा. बाटलीत पाणी घालून एकजीव करा. त्यानंतर तुम्हला फरक दिसून येईल. बॉटल एकदम साफ आणि ताजी दिसेल.
डाळ-तांदूळ न भिजवता करा हॉटेलस्टाईल मसाला डोसा; तव्याला न चिकटता डोसा होईल क्रिस्पी
सैंधव मीठ पाण्याच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी का वापरतात?
सैंधव मीठ एक नैसर्गिक क्लीनर म्हणून काम करते. ते ओलावा शोषून घेते आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. तांदूळ स्क्रबरसारखे कार्य करते आणि बाटलीच्या आतील घाण काढून टाकते. लिंबू लगेच वास घालवतो आणि ताजेपणा आणतो.