Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात बुटांचा कुबट घाणेरडा वास येतो? ३ उपाय- न धुता बुटांची दुर्गंधी जाईल एका झटक्यात

पावसाळ्यात बुटांचा कुबट घाणेरडा वास येतो? ३ उपाय- न धुता बुटांची दुर्गंधी जाईल एका झटक्यात

Monsoon Tips: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बुटांमधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी हे काही उपाय नक्कीच उपयोगी येतील..(how to get rid of bad musty smell from shoes in monsoon?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 16:28 IST2025-07-08T14:50:20+5:302025-07-08T16:28:06+5:30

Monsoon Tips: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बुटांमधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी हे काही उपाय नक्कीच उपयोगी येतील..(how to get rid of bad musty smell from shoes in monsoon?)

how to get rid of bad musty smell from shoes in monsoon, 3 tips to remove odour from shoes in monsoon  | पावसाळ्यात बुटांचा कुबट घाणेरडा वास येतो? ३ उपाय- न धुता बुटांची दुर्गंधी जाईल एका झटक्यात

पावसाळ्यात बुटांचा कुबट घाणेरडा वास येतो? ३ उपाय- न धुता बुटांची दुर्गंधी जाईल एका झटक्यात

Highlights पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बुटांमधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा.

पावसाळ्याची मजाच वेगळी असते. या दिवसांत घराबाहेर सगळीकडे पसरलेली हिरवळ पाहून मन प्रसन्न होऊन जातं. अगदी आपल्या बाल्कनीमधल्या रोपांचीही मरगळ निघून जाते आणि त्यांचाही रंग अगदी वेगळाच चमकदार हिरवा होऊन जातो. या दिवसांत घराबाहेर असं सगळंच साजरं, सुंदर, हिरवं असलं तरी घरात मात्र अनेकदा दमट वातावरणामुळे खूप कोंदट वाटतं. ओलसर कपडे, कपाटातले कपडे, घरातल्या ओलसर जागा येथून दुर्गंधी येते. तशीच काहीशी अडचण ओल्या बुटांचीही होते. शाळा, कॉलेज, ऑफिस यानिमित्ताने घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्यांना रोज बूट घालूनच जावं लागतं. अशावेळी बाहेर पावसात जर बूट ओले झाले तर ते तसेच ओलसर राहतात आणि त्यातून खूप कुबट वास येऊ लागतो. पावसाळी, ढगाळ वातावरण असल्याने बूट धुवून टाकण्याचीही सोय नसते (3 tips to remove odour from shoes in monsoon). अशावेळी बुटांमधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा.(how to get rid of bad musty smell from shoes in monsoon?)

पावसाळ्यात बुटांमधून येणारी दुर्गंधी कशी कमी करावी?

 

१. बटाट्याचा वापर

बुटांमधला दुर्गंध, कुबटपणा शोषून घेण्यासाठी बटाटा खूप उपयोगी ठरतो. हा उपाय करण्यासाठी बूट शु रॅकमध्ये न ठेवता थोडे मोकळ्या जागेत ठेवा.

गुरुपौर्णिमा : नैवेद्याचा शिरा करताना त्यात गाठी होतात? बघा ट्रिक- जिभेवर रेंगाळत राहील अवीट गोडी

यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्या आणि त्याचे ४ ते ५ मोठे मोठे तुकडे करा. आता हे तुकडे बुटांमध्ये रात्रभर ठेवून द्या. बुटांमधली दुर्गंधी खूप कमी झालेली जाणवेल.

 

२. बेकिंग सोडा 

बेकिंग सोड्याचा वापर करूनही बुटांमधला कुबट वास घालवता येतो. हा उपाय करण्यासाठी एक पेपर नॅपकिन घ्या. त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि त्यावर कापूराची एखादी वडी घाला.

पावसाळ्यात अंगाला सारखी खाज येते- खाजवून जखमाही होतात? ५ उपाय- खाज कमी होईल

यानंतर तो पेपर नॅपकिन तसाच बुटांमध्ये ठेवून द्या. बेकिंग सोडा आणि कापूर झाकला जाणार नाही याची काळजी घ्या. ४ ते ५ तासांतच बुटांमधला वास जाईल.

 

३. टाल्कम पावडर

टाल्कम पावडरचा वापर करूनही बुटांमधला कुबट वास घालवता येतो. यासाठी रात्री झोपण्यापुर्वी बुटांमध्ये टाल्कम पावडर घालून ठेवावी. दुसऱ्यादिवशी बूट अगदी फ्रेश वाटतील.

 

Web Title: how to get rid of bad musty smell from shoes in monsoon, 3 tips to remove odour from shoes in monsoon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.