आपल्या स्वयंपाकघरातील किचन सिंकचा वापर दररोज फार मोठ्या प्रमाणांत होत असतो. किचन सिंकमध्ये आपण भाजीपाला - फळे धुण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत अनेक (How To Get Rid of a Smelly Kitchen Sink Drain) काम करतो. किचनमधील स्वच्छतेची बरीचशी कामे ही किचन सिंकमध्येच होत असल्याने किचन सिंक (How to get rid of kitchen sink smells) वापरुन खराब होते. किचन सिंक दररोज वापरात असल्याने त्याच्या स्वच्छतेची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. किचन सिंक वेळच्यावेळी धुवून स्वच्छ केले नाही तर, ते घाण होऊन त्यातून कुबट ( Kitchen Sink Smell Remover) दुर्गंधी येऊ लागते. किचन सिंक मधून येणारी दुर्गंधी काहीवेळा नकोशी वाटू लागते. किचन सिंक स्वच्छ नसले तर ते आरोग्यासाठीही तितकेच हानिकारक ठरु शकते(Useful Hacks for Removing Kitchen Drain Smell).
अन्नपदार्थांचे उरलेले कण, तेलाचे चिकट डाग, तसेच घाण किंवा इतर पदार्थ सिंकच्या नळीत अडकून बसतात आणि हळूहळू घाण साचत जाते. परिणामी दुर्गंधी, बॅक्टेरियांची वाढ आणि सिंक ब्लॉकेज अशा अनेक समस्या उद्भवतात. यावर वेळेवर उपाय न केल्यास ही छोटी वाटणारी समस्या मोठ्या त्रासाचे कारण ठरू शकते. अशा परिस्थितीत, आपण किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी महागडे क्लिनर्स, फिनाईल यांसारख्या गोष्टींचा वापर करतो. परंतु काहीवेळा हे महागडे क्लिनर्स, फिनाईल वापरून देखील किचन सिंकमधील दुर्गंधी कमी होत नाही. अशा परिस्थितीत, आपण चमचाभर मीठ वापरून देखील किचन सिंक मधील दुर्गंधी मिनिटभरात घालवू शकतो.
साहित्य :-
१. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून २. लिक्विड सोडा - २ टेबलस्पून ३. सैंधव मीठ - १ टेबलस्पून ४. कापूर वड्यांचा चुरा - २ टेबलस्पून ५. पाणी - १ ग्लास ६. व्हिनेगर - ३ टेबलस्पून
मूठभर वाळा देतो उन्हाळ्यात गारवा! वाळ्याचे अनोखे ७ उपयोग, स्वस्त, सुगंधी व आरोग्यदायी...
स्वयंपाकघरात तासंतास उभं राहून पाय दुखतात? ३ सोप्या गोष्टी, पाय-टाचा-कंबर दुखणार नाही...
कृती :-
१. ग्लासभर पाणी भांड्यात घेऊन ते पाणी व्यवस्थित गरम करून घ्यावे. २. या गरम पाण्यांत बेकिंग सोडा, लिक्विड सोडा आणि व्हिनेगर घालावे. ३. आता या मिश्रणात कापूर वड्यांचा चुरा देखील घालावा.
आपले किचन सिंक स्वच्छ करण्याचे द्रावण तयार आहे.
याचा वापर कसा करावा ?
सगळ्यात आधी १ टेबलस्पून सैंधव मीठ घेऊन ते किचन सिंकच्या मध्यभागावर असणाऱ्या जाळीदार भागावर पसरवून घालावे. त्यानंतर, अजून १ टेबलस्पून सैंधव मीठ घेऊन ते या मध्यभागावर असणाऱ्या जाळीदार भागातून आत पाईपमध्ये सोडावे. त्यानंतर, लगेच तयार केलेले गरम पाण्याचे द्रावण ओतावे. ५ ते १० मिनिटे हे तसेच राहू द्यावे. त्यानंतर पाणी सोडून किचन सिंक स्वच्छ धुवून घ्यावे. हा उपाय आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केल्यास किचन सिंक मधून येणारी कुबट दुर्गंधी येण्याचे प्रमाण कमी होते.