भारतीय जेवणाची थाळी ही वरण-भाताशिवाय अपूर्णच. करायला अगदी सोपा आणि मऊ पदार्थ म्हणजे वरण-भात.(Kitchen Hacks) पण अनेकदा हा पदार्थ करताना देखील आपल्या नाकी नऊ येतात. वरण-भात हा पदार्थ सहसा प्रेशर कुकरमध्ये केला जातो.(Pressure cooker not whistling) यामुळे पदार्थाची चव देखील वाढते आणि कुकरच्या अवघ्या तीन शिट्ट्यांमध्ये बनतो. परंतु, कुकर घेताना किंवा शिट्ट्या करताना आपण अनेक लहान-सहान चुका करतो.(How to fix pressure cooker whistle problem) ज्यामुळे शिट्टी लवकर होत नाही, प्रेशर कुकरमधून हवा बाहेर पडते, किंवा झाकणातून पाणी फसफसून बाहेर येते.(Cooker water spilling issue solution) यामुळे कुकरसह गॅसचा बर्नरदेखील खराब होतो. शिट्टीतून बाहेर उडालेलं पाणी आणि किचनचा ओटा साफ करण्यात अर्धा वेळ निघून जातो.(Pressure cooker lid problem fix) यामुळे किचन तर खराब होतेच पण आजूबाजूच्या भिंती, डबे देखील खराब होतात. (Pressure cooker maintenance tips)
कोथिंबीर लवकर सडते - पाने पिवळी पडतात? सोपी ट्रिक, आठवडाभर फ्रीजशिवाय राहिल ताजी-हिरवीगार
1. प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवली जाते कारण इतर भांड्यांपेक्षा त्यात डाळ लवकर शिजते. सतत वापरल्याने कुकर देखील व्यवस्थित काम करत नाही. बऱ्याचदा शिट्टीमध्ये समस्या आली किंवा कुकरची गॅस्केट सैल असल्यामुळे शिट्टी वाजायची थांबत नाही. यामुळे डाळ शिजवताना, शिट्टी वाजताच त्यातील पाणी बाहेर पडू लागते. आपला प्रेशर कुकर अधिक जुना झाला असेल तर हा तेलाचा सोपा हॅक वापरुन पाहा.
2. जर आपण मसूरची डाळ शिजवत असू आणि कुकरच्या शिट्टीतून बाहेर पडत असेल तर तेलाचा सोपा उपाय करा. त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये मसूर, पाणी आणि हळद घाला. तसेच चवीनुसार मीठ घाला. या डाळीत २ ते ४ थेंब तेल घाला. तसेच कुकरच्या झाकणाच्या छिद्रात म्हणजेच जिथे शिट्टी असेल तिथे देखील ३ ते ४ तेलाचे थेंब घाला. आता प्रेशर कुकरचे झाकण ठेवा. ही डाळ जास्त आणि मध्यम आचेवर शिजवा.
3. कुकरचा गॅस्केट सैल झाला आहे की, नाही हे तपासा. कधीकधी यामुळे देखील शिट्टी वाजत नाही आणि यामुळे कुकरमधून पाणी निघते. अशावेळी रबर बदला. काही लोक कुकरची शिट्टी आणि गॅस्केट अजिबात स्वच्छ करत नाही. त्यामुळे त्यात घाण साचते, ज्यामुळे ब्लॉक होते आणि डाळ बाहेर पडते. कुकर लावताना किंवा पदार्थ शिजवताना भरपूर पाणी घालू नका. यामुळे पाणी फसफसून बाहेर येते.