How to clean phone cover : जास्तीत जास्त सर्वसामान्य लोक फोन तुटू नये म्हणून त्यावर फायबर किंवा रबराचं कव्हर लावतात. यानं फोन थोडा जाड दिसतो, मात्र फोन पडला तर नुकसानापासून बचाव होतो. सोबतच फोनला एक वेगळा लूकही येतो. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक ट्रान्सपरंट कव्हर वापरतात. कारण यानं फोनचा आतला रंगही दिसतो.
फोनचं कव्हर बरेच दिवस वापरल्यावर त्याचा रंग बदलतो. कव्हर पिवळ्या रंगाचं किंवा काळपट दिसू लागतं. ज्यामुळे फोन चांगलं दिसत नाही. कोपऱ्यांमध्ये काळपटपणाही दिसतो. धूळ, माती याची कारणं असतात. पण अशात नेहमी नेहमी फोनचं कव्हर बदलण्याऐवजी काही घरगुती उपाय करून कव्हर पुन्हा चमकदार, स्वच्छ करू शकता.
बेकिंग सोडा - पाणी
मोबाइलचं कव्हर साफ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट फोनच्या बॅक कव्हरवर लावा आणि ब्रशच्या मदतीनं हलक्या हातानं घासा. नंतर फोन थोडा वेळ तसाच ठेवा. काही वेळानं कोमट पाण्यानं कव्हर धुवून घ्या.
लिंबू - मीठ
लिंबू आणि मिठाच्या मदतीनं देखील फोनच्या कव्हरचा पिवळेपणा किंवा काळपटपणा दूर केला जाऊ शकतो. यासाठी फोनवरून कव्हर काढा. त्यावर लिंबाचा रस आणि थोडं मीठ टाका. हे मिश्रण कव्हरवर काही वेळ घासा. थोड्या वेळानं पाण्यानं धुवून घ्या. फरक लगेच दिसून येईल.
व्हिनेगर - बेकिंग सोडा
फोनचं कव्हर साफ करण्यासाठी आपण व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता. यासाठी एका भांड्यामध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करा. आता या मिश्रणात कव्हर ३० मिनिटं टाकून ठेवा. नंतर ब्रशनं हलक्या हातानं घासा व पाण्यानं धुवून घ्या. फरक दिसून येईल.