सण असो किंवा पाहुण्यांची ये-जा घर स्वच्छ आणि लख्ख असेल तर मनाला एक वेगळेच समाधान मिळते. पण घरातील सर्वात कठीण काम म्हणजे बाथरुमच्या टाईल्स आणि फरशीवरचे जुनाट डाग स्वच्छ करणे.(How to clean yellow bathroom tiles) कितीही घासले तरी पाण्याचे डाग किंवा साबणाचा चिकट थर काही निघत नाही. यामुळे बाथरुममधील टाईल्स पिवळट किंवा काळ्या दिसतात. (Cleaning Hacks)
अनेकदा बाथरुम स्वच्छ करण्यासाठी आपण महागडे केमिकल्स वापरतो. पण यात असणारे घटक त्वचेसाठी हानिकारक असतात.(How to clean dirty tiles) आपल्या स्वयंपाकघरात अशा काही वस्तू असतात ज्याचा वापर करुन आपण अगदी जुनाट आणि कडक झालेले डागही मिनिटांत स्वच्छ करु शकतो. बाथरूममधील टाईल्सच्या फटीत साचलेली काळी घाण असो वा कोपऱ्यात जमलेला पिवळटपणा काढण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.
आजी-आईला केमिकल डायनं होतो त्रास-‘हा’ नॅचरल उपाय देतो सुंदर आणि सेफ बर्गंडी रंग
सध्या अनेक घरांमध्ये मार्बल आणि पांढऱ्या रंगाच्या फरशी पाहायला मिळतात. रोज झाडू आणि मॉपने साफसफाई करुनही त्यावर अनेकदा काळे डाग किंवा चट्टे राहतात, जे स्वच्छ करण कठीण असते. यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात १ कप व्हिनेगर, अर्धा कप बेकिंग सोडा, २ लिंबाचा रस आणि थोडे लिक्विड सोप मिसळा. हे द्रावण एका स्प्रे बाटलीत भरून घाणेरड्या टाईल्सवर फवारा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्या. यामुळे काही मिनिटांत फरशी स्वच्छ होईल.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगरमध्ये असणारे घटक फरशीवरील डाग हटवण्यास मदत करतात. जर आपल्या टाईल्सवर गंज किंवा पिवळे डाग लागले असतील तर लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करुन त्या जागी लावा. लिंबातील सायट्रिक अॅसिड नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते, ज्यामुळे डाग सहज निघतात.
फरशीवरील चिकटपणा आणि कोपऱ्यात साचलेली घाण काढण्यासाठी कोमट पाण्याच भांडी घासण्याचे लिक्विड मिसळा. यामुळे फरशीला चमक येईल. बाथरूमच्या टाईल्समधील फटीत काळी घाण किंवा बुरशी साचली असेल, तर त्यावर थोडे हायड्रोजन पेरॉक्साईड फवारा. ५ मिनिटांत ती घाण आपोआप वर येईल.
Web Summary : Easily clean bathroom tiles with common household items like vinegar, baking soda, and lemon. This mixture removes stubborn stains and grime effectively. A simple and cheap solution for a sparkling bathroom.
Web Summary : सिरका, बेकिंग सोडा और नींबू जैसे घरेलू सामानों से बाथरूम की टाइलों को आसानी से साफ करें। यह मिश्रण जिद्दी दाग और गंदगी को प्रभावी ढंग से हटाता है। एक शानदार बाथरूम के लिए एक सरल और सस्ता उपाय।