भाज्या चिरण्यासाठी पुर्वी घरोघरी विळी असायची. पण आता मात्र काही मोजक्या घरांमध्येच विळी उरली आहे. विळीची जागा आता स्टायलिश चॉपिंग बोर्डने घेतली असून घरोघरी आता त्याच्यावरच भाज्या चिरल्या जातात. चॉपिंग बोर्डमुळे खरंतर काम खूप सोपं झालं आहे. उभ्या उभ्या अगदी झटपट भाज्या चिरता येतात आणि तो स्वच्छ करायलाही सोपा जातो. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की लाकडी चॉपिंग बोर्ड काही महिन्यांनी काळपट पडायला लागतो. त्यावर काळे, पिवळे असे डाग दिसायला लागतात (simple tricks and tips to clean wooden chopping board). नुसत्या पाण्याने धुवून ते डाग जात नाहीत (how to clean wooden chopping board?). त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पुढे सांगितलेल्या पद्धतीने चॉपिंग बोर्डची स्वच्छता होणं गरजेचं आहे.(how to remove yellow, black stains from wooden chopping board?)
लाकडी चॉपिंग बोर्ड कसा स्वच्छ करावा?
१. लाकडी चॉपिंग बोर्ड साबणाने घासणं टाळायला हवं. कारण लाकडावर जे काही छिद्रं असतात त्या छिद्रांमध्ये साबणाचे कण अडकून बसतात. भाज्या चिरताना ते भाज्यांमध्ये मिसळू शकतात आणि आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे लाकडी चाॅपिंग बोर्डला साबण, डिशवॉश लावणे टाळा.
ओपन पोअर्स, पिंपल्स वाढल्याने चेहरा थोराड वाटतो? १ सोपी ट्रिक- त्वचा होईल मऊ, तरुण, सुंदर
२. २ ते ३ दिवसांतून एकदा लाकडी चॉपिंग बोर्डवर मीठ टाका आणि लिंबाची फोड त्यावर घासून चॉपिंग बोर्ड स्वच्छ करा. यामुळे त्याच्यावरचे काळसर डाग निघून जातील.
३. तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून त्याची थोडी जाडसर पावडर करा. ही पावडर आणि थोडी हळद एकत्र करा आणि ते चॉपिंग बोर्डवर टाका.
पदार्थांचा मनसोक्त सुगंध घ्या आणि भराभर वजन कमी करा? शास्त्रज्ञांनी शोधली वेटलॉसची आगळीच पद्धत..
यानंतर तारेच्या किंवा प्लास्टिकच्या घासणीने घासून चॉपिंग बाेर्ड स्वच्छ करून घ्या. या घरगुती उपायांनी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करणे कधीही चांगले. दोन ते तीन दिवसांतून एकदा नियमितपणे या पद्धतीने चॉपिंग बोर्ड स्वच्छ केल्यास तो काळपट, पिवळा होणार नाही. नेहमीच स्वच्छ असेल.