Join us

साबण - डिशवॉश लावून लाकडी चॉपिंग बोर्ड धुणं धोकादायक! तज्ज्ञ सांगतात, बोर्ड स्वच्छ करण्यासाठी.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 18:10 IST

Simple Home Hacks For Cleaning Wooden Chopping Board: लाकडी चॉपिंग बोर्ड वापरताना काही गोष्टींची खबरदारी घेतलीच पाहिजे.. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा..(how to clean wooden chopping board?)

ठळक मुद्देलाकडी चॉपिंग बोर्डची जर तुम्ही योग्य ती स्वच्छता करू शकला नाहीत तर ते बोर्ड आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात..

भाज्या चिरण्यासाठी पुर्वी घरोघरी विळी पाहायला मिळायची. पण आता काही मोजके अपवाद सोडले तर जवळपास प्रत्येक घरातूनच विळी हद्दपार झाली आहे. विळ्यांच्या जागी आता चॉपिंग बोर्ड आणि सुऱ्या आल्या आहेत. यामुळे उभं राहून भाज्या चिरण्याचं काम खूपच पटापट होतं हे अगदी खरं. पण त्यासोबतच प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरणे आरोग्यासाठी किती घातक आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात आलेलंच आहे. त्यामुळे प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड आता बऱ्याच घरातून बाहेर काढले गेले आणि तिथे लाकडी चॉपिंग बोर्ड आले (simple home hacks for cleaning wooden chopping board). पण आता काही तज्ज्ञ असंही सांगत आहेत की लाकडी चॉपिंग बोर्डची जर तुम्ही योग्य ती स्वच्छता करू शकला नाहीत तर ते बोर्डही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात..(how to clean wooden chopping board?) 

 

लाकडी चॉपिंग बोर्ड वापरताना काय काळजी घ्यावी?

काही डॉक्टर असं सांगतात की लाकडी चॉपिंग बोर्डवर काही बारीक छिद्रं असतात. जेव्हा तुम्ही त्या चॉपिंग बोर्डवर फळं, भाज्या चिरता तेव्हा त्यांचा रस त्या बोर्डवर सांगतो आणि त्या छिद्रांमध्ये जाऊन बसतो.

उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक

जर बोर्ड स्वच्छ करताना तुम्ही तो वरवर स्वच्छ केला तर भाज्यांच्या रसामधले सुक्ष्म कण तिथेच साचून राहतात. त्यातून अनेक मायक्रोब्स आणि व्हायरस तयार होतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. जर तुम्ही डिशवॉश किंवा साबण लावून ते स्वच्छ करत असाल तर साबणाचेही अनेक सुक्ष्म कण लाकडाला चिटकून राहतात. त्यामुळे लाकडी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी डिशवॉश किंवा साबण वापरणे टाळायला हवे. 

 

लाकडी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्याची पद्धत 

लाकडी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तो आधी गरम पाण्याने धुवा. 

ना मातीची गरज ना कुंडीची!! बघा एखाद्या रिकाम्या बाटलीमध्ये पुदिना लावण्याचा भन्नाट उपाय

त्यानंतर हळद, मीठ असे पदार्थ वापरून तो घासून काढा. तांदळाचे पीठ वापरूनही तुम्ही चॉपिंग बोर्ड स्वच्छ करू शकता. यामुळे त्याच्यात अडकलेले पदार्थ निघून जातील. त्यानंतर तो साबण किंवा डिशवॉश न लावता एखाद्या घासणीने घासून काढा. 

या पद्धतीने आठवड्यातून ३ ते ४ वेळा तुमचा चॉपिंग बोर्ड स्वच्छ व्हायला हवा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स