Join us

रोज वापरून लाकडी पोळपाट- लाटणं काळं पडलं? ३ सोपे उपाय- नव्यासारखं स्वच्छ होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 15:57 IST

Cleaning Tips: लाकडी पोळपाट- लाटणं काळं पडलं असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..(how to clean wooden chakla or polpat?)

ठळक मुद्देलाकडी पोळपाट- लाटणं कधीही साबण लावून स्वच्छ  करून नये असे तज्ज्ञ सांगतात. कारण ....

एखाद्या वेळी भात, आमटी असे पदार्थ स्वयंपाकात नसले तरी चालतात. कधी कधी भाजी नसली तरीही चालते. पण पोळ्या किंवा चपाती मात्र अनेक घरांमध्ये हमखास लागतेच. जोपर्यंत पोळी खात नाही, तोपर्यंत अनेकांना पोट भरल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे काही अपवाद सोडले तर बहुतांश घरे अशी आहेत जिथे रोजच्या रोज पोळी केलीच जाते. आता पोळ्या किंवा चपात्या करण्यासाठी पोळपाट, लाटणं लागतं. काही घरांमध्ये ते ॲल्युमिनियमचं असतं तर बहुतांश घरांमध्ये ते लाकडाचं असतं. लाकडी पोळपाट आणि लाटणं रोज वापरलं तर ते काही दिवसांतच काळं पडतं आणि अस्वच्छ वाटू लागतं (how to clean wooden chakla or polpat?). म्हणूनच त्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल ते पाहूया..(how to clean  wooden belan or rolling pan and chakla?)

 

लाकडी पोळपाट लाटण्याची स्वच्छता कशी करावी?

लाकडी पोळपाट लाटणं जर तुम्ही रोजच्या रोज साबण लावून स्वच्छ करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण लाकडी पोळपाट- लाटण्याला अगदी बारीक छिद्रं असतात.

टॅनिंग वाढल्याने चेहरा काळवंडला? त्वचेचा काळेपणा घालविण्यासाठी जावेद हबीब सांगतात खास उपाय

त्या छिद्रांमध्ये साबण किंवा डिशवॉशमध्ये असणाऱ्या केमिकल्सचे सुक्ष्म कण अडकून बसतात. ते आपल्या पिठामध्ये मिसळल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे लाकडी पोळपाट- लाटणं कधीही साबण लावून स्वच्छ  करून नये असे तज्ज्ञ सांगतात.

 

लाकडी पोळपाट लाटणं कसं स्वच्छ करावं?

१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एका भांड्यामध्ये गरम पाणी करा. त्या पाण्यात १५ मिनिटांसाठी पोळपाट लाटणं भिजत घाला आणि नंतर त्यावर मीठ घासून ते स्वच्छ करा. काळेपणा कमी होईल.

२. मीठ आणि व्हिनेगर हे दोन्ही पदार्थ एका वाटीमध्ये एकत्र करा. त्यानंतर वायरच्या घासणीवर हे मिश्रण घ्या आणि त्याने पोळपाट लाटणं घासून काढा. यानंतर पोळपाट लाटणी १० ते १५ मिनिटे गरम पाण्यात भिजत घाला आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

केस जाड आणि लांब होण्यासाठी २ सोप्या टिप्स- केसांच्या सगळ्याच समस्या होतील कमी 

३. लिंबू पिळल्यानंतर आपण त्याचं साल फेकून देतो. पण त्याचा खूप चांगला उपयोग पोळपाट लाटणं स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो. यासाठी लिंबाच्या सालीवर थोडं मीठ घाला आणि त्याने पोळपाट लाटणं घासून काढा. काळपटपणा निघून ते एकदम स्वच्छ होईल. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीकिचन टिप्ससोशल व्हायरल