Join us

बोअरवेलच्या पाण्यामुळे बादल्यांवर पांढरे डाग पडले? २ सोपे उपाय- ५ मिनिटांत बादली चकाचक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 15:49 IST

How To Clean Plastic Bucket?: बोअरवेलच्या पाण्यामुळे प्लास्टिकच्या बादलीवर पडलेले पांढरट डाग कसे स्वच्छ करायचे ते पाहूया..(how to clean white stains of hard water on bucket?)

ठळक मुद्देबादली धुवून घेतल्यावर डाग पुर्णपणे निघून गेलेले दिसतील. जर डाग पक्के असतील तर अजून एकदा हाच उपाय करून पाहा. 

हल्ली घरोघरी बोअरवेलचे पाणी असते. त्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने नळांवर, बेसिनच्या भांड्यावर, आंघाेळीच्या पाण्याच्या बादलीवर, मगवर पाण्याचे पांढरट डाग पडतात. हे डाग काही दिवसांतच एवढे जास्त वाढलेले दिसतात की त्यामुळे मग नव्या बादल्याही अगदी जुन्या, खराब झालेल्या दिसू लागतात. हे डाग वेळीच स्वच्छ केले नाही तर ते जास्त पक्के होत जातात. नंतर ते स्वच्छ करायलाही खूप वेळ आणि मेहनत लागते (How To Clean Plastic Bucket?). म्हणूनच आता हे काही सोपे उपाय पाहा आणि क्षारांमुळे पांढरट पडलेल्या बादल्या काही मिनिटांत चकाचक करून टाका.(how to clean white stains of hard water on bucket?)

बोअरवेलच्या पाण्यामुळे बादल्यांवर पडलेले पांढरट डाग कसे काढावे?

 

१. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

हा एक अगदी सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही वापरून शकता. सगळ्यात आधी बादली थोडी ओलसर करून घ्या.

जास्वंदाला फुलंच येत नाहीत ४ साध्या- सोप्या टिप्स- फुलांनी भरून जाईल छोटंसं रोप

यानंतर एका वाटीमध्ये २ चमचे बेकिंग सोडा, २ चमचे हार्पिक आणि ४ चमचे व्हिनेगर घ्या. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. आता हे मिश्रण एखाद्या ब्रशच्या मदतीने ओलसर केलेल्या बादलीवर लावा आणि एखादा मिनिट तसेच राहू द्या. त्यानंतर बादलीवर थोडे कोमट पाणी टाका आणि ब्रशने बादली घासून काढा. काही वेळातच बादली अगदी चकाचक होईल.

 

२. शाम्पू 

तुमच्या घरातला एखादा शाम्पू वापरूनही तुम्हाला बादल्यांवरचे क्षाराचे डाग काढून टाकता येतील. त्यासाठी एका वाटीमध्ये शाम्पू घ्या आणि त्यामध्ये त्याच्या दुप्पट डिश वॉश लिक्विड घाला.

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग नेहमीच बहरलेली राहतील..

सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि हे मिश्रण बादलीला लावून ती घासून काढा. बादली धुवून घेतल्यावर डाग पुर्णपणे निघून गेलेले दिसतील. जर डाग पक्के असतील तर अजून एकदा हाच उपाय करून पाहा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सपाणीहोम रेमेडी