आरोग्यासाठी पाणी पिणे खूपच आवश्यक असते याचबरोबर हे पाणी स्वच्छ व शुद्ध असणेही तितकेच गरजेचे असते. आपल्या घरात नळाने येणारे पाणी थेट शुद्ध न करता पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा पाण्यामध्ये अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. या अशुद्धी दूर करण्यासाठी वॉटर फिल्टरचा वापर केला जातो. आजकाल प्रत्येक घरात पाणी शुद्ध करण्यासाठी वॉटर फिल्टर हमखास लावलाच जातो. परंतु, हा फिल्टर काही दिवस वापरल्यानंतर त्यामध्ये पाण्यातील क्षार, गाळ आणि इतर घाण जमा होऊ लागते(how to clean water purifier at home).
परिणामी, पाण्याची चव बदलते तसेच फिल्टरची कार्यक्षमता देखील कमी होते. अशावेळी, अनेकजण फिल्टर स्वच्छ करण्यासाठी किंवा सर्व्हिसिंगसाठी टेक्निशियनला बोलावतात आणि त्यासाठी मोठा खर्च देखील करतात. पण खरं सांगायचं तर, इतका खर्च करण्याची गरज नसतेच, कारण काही सोपे आणि घरगुती उपाय वापरून आपण घरबसल्या वॉटर फिल्टर पूर्णपणे स्वच्छ आणि नव्यासारखा करू शकतो. वॉटर फिल्टरला पुन्हा नव्यासारखे चकचकीत आणि कार्यक्षम करण्यासाठी एकही रुपया खर्च करण्याची किंवा (easy way to clean water filter viral water filter cleaning trick) महागडी सर्व्हिसिंग करण्याची गरज नाही. वॉटर फिल्टर घरच्याघरीच मिनिटभरात स्वच्छ करण्याचा १ सोपा घरगुती उपाय पाहूयात.
वॉटर फिल्टर घरच्याघरीच स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक...
वॉटर फिल्टर घरच्याघरीच स्वच्छ करण्यासाठी आपल्याला व्हिनेगर, गरम पाणी, लिक्विड डिटर्जंट इतक्या ३ गोष्टींची गरज लागणार आहे. वॉटर फिल्टरची सफाई करण्यासाठी सर्वात आधी फिल्टरचे दोन्ही स्क्रू काळजीपूर्वक काढा. यानंतर, त्यामधून फिल्टर काढून बाजूला ठेवा.
आता फिल्टरच्या बॉक्समध्ये कोमट पाणी ओतून तो स्क्रबरने घासून स्वच्छ करा. आता फिल्टर साफ करण्यासाठी, एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर घाला. या तयार द्रावणात फिल्टरला २० मिनिटांसाठी भिजवून ठेवा.
२० मिनिटानंतर फिल्टर या द्रावणातून बाहेर काढा आणि त्याला ३ वेळा पाण्याने धुवून स्वच्छ करा. यामुळे बरीच घाण निघून जाईल. आता तुम्हाला दुसरे एक द्रावण तयार करून फिल्टर साफ करायचा आहे. यासाठी गरम पाणी आणि लिक्विड डिटर्जंट एकत्रित मिसळा. या द्रावणात फिल्टरला पुन्हा १० मिनिटांसाठी भिजवून ठेवा.
महिनाभर टिकणारी आलं लसूण पेस्ट करण्यासाठी ८ टिप्स, टिकते छान-विकत आणायची गरजच नाही..
नंतर, हाताने त्याला हलकेच घासून चांगल्या प्रकारे साफ करा. आता ३ ते ४ वेळा पाण्याने त्याला व्यवस्थित स्वच्छ करा, अशा प्रकारे वॉटर फिल्टर घरच्याघरीच एक रुपयाही खर्च न करता पुन्हा पहिल्यासारखा साफ होईल.
Web Summary : Water filters accumulate dirt, affecting taste and efficiency. Clean it easily at home using vinegar, warm water, and liquid detergent. This simple method saves on servicing costs and restores filter performance quickly.
Web Summary : वॉटर फिल्टर में गंदगी जमा हो जाती है, जिससे स्वाद और कार्यक्षमता प्रभावित होती है। इसे घर पर सिरका, गर्म पानी और लिक्विड डिटर्जेंट का उपयोग करके आसानी से साफ करें। यह सरल तरीका सर्विसिंग खर्च बचाता है और फिल्टर के प्रदर्शन को जल्दी से पुनर्स्थापित करता है।