Lokmat Sakhi >Social Viral > मोबाईलचं ट्रान्सपरेंट सिलिकॉन कव्हर पिवळं पडलं तरी नो टेन्शन; 'असं' करा लखलखीत

मोबाईलचं ट्रान्सपरेंट सिलिकॉन कव्हर पिवळं पडलं तरी नो टेन्शन; 'असं' करा लखलखीत

मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रान्सपरेंट सिलिकॉन कव्हर वापरतात. हे कव्हर फोनला स्क्रॅच, धूळ आणि तुटण्यापासून वाचवण्यास मदत करतात. पण कालांतराने कव्हर पिवळं पडतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:45 IST2025-02-16T14:44:34+5:302025-02-16T14:45:02+5:30

मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रान्सपरेंट सिलिकॉन कव्हर वापरतात. हे कव्हर फोनला स्क्रॅच, धूळ आणि तुटण्यापासून वाचवण्यास मदत करतात. पण कालांतराने कव्हर पिवळं पडतं.

how to clean transparent silicon mobile cover remove the yellowish and black stains | मोबाईलचं ट्रान्सपरेंट सिलिकॉन कव्हर पिवळं पडलं तरी नो टेन्शन; 'असं' करा लखलखीत

मोबाईलचं ट्रान्सपरेंट सिलिकॉन कव्हर पिवळं पडलं तरी नो टेन्शन; 'असं' करा लखलखीत

आजकाल बहुतेक लोक त्यांचा मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रान्सपरेंट सिलिकॉन कव्हर वापरतात. हे कव्हर फोनला स्क्रॅच, धूळ आणि तुटण्यापासून वाचवण्यास मदत करतात. पण कालांतराने कव्हर पिवळं पडतं आणि घाणेरडं दिसू लागतं. हे विशेषतः धूळ, घाम आणि सूर्यकिरणांच्या प्रभावामुळे होतं. पण आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी पद्धती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ट्रान्सपरेंट सिलिकॉन कव्हरचा पिवळेपणा आणि डाग दूर करू शकता.

बेकिंग सोडा आणि पाणी

- बेकिंग सोडा हा एक उत्कृष्ट नॅचरल क्लिनर आहे, जे डाग आणि पिवळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी ठरतं.
- एका भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी घाला आणि पेस्ट बनवा.
- ही पेस्ट कव्हरवर लावा आणि टूथब्रश किंवा स्पंजच्या मदतीने हलक्या हाताने घासून घ्या.
- ५ ते १० मिनिटं असंच राहू द्या, नंतर कोमट पाण्याने धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून टाका.

व्हाईट व्हिनेगर आणि कोमट पाणी

- व्हाईट व्हिनेगर एक उत्तम नॅचरल क्लिनर आहे, जो सिलिकॉनमधील घाण आणि डाग काढून टाकण्यास मदत करतो.
- एका भांड्यात अर्धा कप व्हाईट व्हिनेगर आणि अर्धा कप कोमट पाणी मिसळा.
- त्यात सिलिकॉन कव्हर ३०-४० मिनिटं भिजवा.
- नंतर ब्रशने हळूवारपणे स्वच्छ करा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

टूथपेस्टने स्वच्छ करा

- टूथपेस्टमध्ये असलेले सूक्ष्म-क्लीनिंग एजंट पिवळेपणा दूर करण्यास मदत करू शकतात.
- सिलिकॉन कव्हरवर पारदर्शक किंवा पांढरी टूथपेस्ट लावा.
- टूथब्रशच्या मदतीने हलक्या हाताने घासून काही मिनिटं तसेच राहू द्या.
- नंतर ते कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ कपड्याने पुसा.

सॅनिटायझरने स्वच्छता

-बॅक्टेरिया आणि डाग काढून टाकण्यासाठी सॅनिटायझर प्रभावी आहे.
- कापसावर थोडं सॅनिटायझर घ्या.
- ते कव्हरवर लावा आणि ते पूर्णपणे पुसून टाका.
- शेवटी स्वच्छ कपड्याने पुन्हा एकदा पुसून घ्या.

डिश वॉशिंग लिक्विड आणि बेकिंग सोडा

- जर कव्हर खूप घाणेरडं असेल तर डिश वॉशिंग लिक्विड आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण प्रभावी ठरेल.
- एका भांड्यात एक चमचा डिशवॉशिंग लिक्विड आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळा.
- स्पंज किंवा टूथब्रशने कव्हर हळूवारपणे स्वच्छ करा.
- नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
 

Web Title: how to clean transparent silicon mobile cover remove the yellowish and black stains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.