Toilet Cleaning Trick : घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवण्यासोबत टॉयलेट स्वच्छ ठेवणं फारच डोकेदुखीचं काम असतं. ब्रशने अनेकदा जोर लावून घासूनही टॉयलेट सीटवरील पिवळे डाग काही केल्या जात नाहीत. आपणही टॉयलेट सीटच्या डागांना वैतागले असाल तर चिंता सोडा. कारण आम्ही आपल्यासाठी एक सोपी ट्रिक घेऊ आलो आहोत. या ट्रिकने टॉयलेट सीटचे डाग जास्त मेहनत न घेताही दूर होतील. महत्वाची बाब म्हणजे यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.
घरातील टॉयलेट स्वच्छ करण्याची ही सोपी ट्रिक लोकांना खूपच आवडली. कारण याच्या मदतीने कमी मेहनत करूनही सीट स्वच्छ आणि चमकदार होईल. खास बाब म्हणजे ब्रशने फार जोर लावत घासण्याची देखील गरज पडणार नाही. लगेच डाग आणि दु्र्गंधी दूर होईल.
काय आहे नो-ब्रश क्लीनिंग हॅक?
नो-ब्रश क्लीनिंग हॅक टॉयलेट सीट स्वच्छ करण्याची एक फारच सोपी पद्धत आहे. यात आपण जास्त वेळ न घालवता आणि जास्त मेहनत न करताही घरातील टॉयलेट सीट लगेच साफ करू शकता. यासाठी केवळ टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याची गरड पडेल. या दोन्हींची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट हलक्या स्क्रबरसारखं काम करते.
कसा कराल वापर?
सगळ्यात आधी एका बाउलमध्ये थोडी टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा मिक्स करा. ही पेस्ट टॉयलेटवर सीटवर सगळीकडे लावा. काही मिनिटांसाठी ही पेस्ट तशीच लावून ठेवा. नंतर स्पंज किंवा कापडाच्या मदतीने हलक्या हाताने टॉयलेट सीट साफ करा. शेवटी टॉयलेट सीट पाण्याने धुवून घ्या.
या ट्रिकची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे टॉयलेट साफ करण्यासाठी आपल्याला बाजारातून कोणतेही महागडे प्रॉडक्ट आणण्याची गरज पडणार नाही. म्हणजे आपले पैसे वाचतील. सोबतच कमी मेहनत करूनच आपलं काम पूर्ण होईल. टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा सगळ्याच घरांमध्ये सहजपणे मिळतो.
Web Summary : Easily clean toilet seats with toothpaste and baking soda. Mix into a paste, apply, and rinse for a sparkling, odor-free result. No harsh scrubbing needed!
Web Summary : टूथपेस्ट और बेकिंग सोडा से टॉयलेट सीट को आसानी से साफ करें। पेस्ट बनाएं, लगाएं और धो लें। सीट चमक उठेगी और दुर्गंध दूर होगी, बिना ज़्यादा मेहनत के!