'गॅस शेगडी' ही आपल्या किचनमधील रोजच्या वापरातील सर्वात महत्वाची वस्तू आहे. किचनमधील गॅस शेगडीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. दररोज या गॅस शेगडीचा वापर होत असल्याने (How To Clean The Gas Stove Burner at Home) त्याच्या स्वच्छतेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. स्वयंपाक झाल्यावर आणि विकेंडला आपण गॅस शेगडी, ओटा, टाईल्स स्वच्छ करतो. याचवेळी (How to clean gas stove burners at home to keep it like new) आपण शेगडी मधील बर्नरही स्वच्छ करतो. परंतु काहीवेळा ते म्हणावे तसे स्वच्छ होतातच असे नाही. नवीन आणल्यावर पितळी म्हणजेच पिवळट असणारे हे बर्नर कालांतराने वापरुन काळेकुट्ट होतात. कधी यावर दूध ओतू जातं तर कधी तेल सांडतं(How to clean Gas Stove Burners).
कधी थेट बर्नरवर फुलके, वांगी, पापड भाजल्याने त्याचे कणही बर्नरमध्ये अडकतात आणि ते खराब होतात. असे खराब झालेले बर्नर व्यवस्थित पेटत देखील नाहीत. गॅसची फेल्म कमी - जास्त करायची म्हटलं तरी ती नीट करता येत नाही. गॅस बर्नरमधून फेल्म अशा पद्धतीने व्यवस्थित पेटत नसेल तरीही ते तितकेच धोकादायक आहे. काहीवेळा आपण बघतो की गॅसची फ्लेम बर्नर मधील लीक होऊन बाहेर येऊन अधिक जास्त प्रमाणांत पेट घेते. असे होऊ नये यासाठी सर्वात आधी गॅस बर्नरची योग्य पद्धतीने सफाई करणे गरजेचे असते तसेच बर्नर मधून गॅस लीक होऊ नये यासाठी एक खास टीप देखील पाहूयात.
१. गॅस बर्नर स्वच्छ करण्याची योग्य पद्धत....
एका बाऊलमध्ये बर्नर ठेवून त्यावर एकदम गरम पाणी ओतायचे. या गरम पाण्यातील बर्नरवर लिंबाची अर्धी फोड पिळायची. इनो म्हणजेच फ्रूट सॉल्टचे १ पॅकेट यामध्ये घालायचे. त्यानंतर यामध्ये साधारण चमचाभर मीठ आणि बेकींग सोडा घालायचा. या सगळ्या गोष्टींचे रासायनिक मिश्रण तयार होते त्यामध्ये साधारण ४ तास बर्नर तसाच भिजत ठेवायचा. मग बर्नर काढून तारेच्या घासणीवर लिक्विड सोप घेऊन त्याने बर्नर हलक्या हाताने घासायचा.काही मिनीटांतच हा बर्नर नव्यासारखा चमकताना दिसेल.
न कापता, चाकू-सुरी न वापरता खरबूज-टरबूज चिरा, पाहा ‘हे’ भन्नाट फ्रुट कटर...
कारली - भोपळा आणि मिरच्यांच्या बिया काढण्यासाठी पाहा भन्नाट कटर, काही सेकंदात करा झटपट काम...
२. गॅस बर्नर मधून गॅस लीक होत असेल तर...
जर गॅस बर्नर मधून गॅस लीक होत असेल किंवा गॅस बर्नर व्यवस्थित पेटत नसेल तर आपण हा उपाय नक्की करू शकता. यासाठी आपल्याला टूथपेस्ट आणि दात घासायचा जुना ब्रश इतक्या दोनच गोष्टी लागणार आहेत. सर्वात आधी गॅस बर्नर स्वच्छ करून मग ब्रशवर थोडी टूथपेस्ट घेऊन ती बर्नरच्या आतील भागाला लावा. त्यानंतर शेगडीवर आपण हा बर्नर ज्या भागात लावून ठेवतो त्या भागात देखील बोटांच्या मदतीने टूथपेस्ट पसरवून लावावी. आता टूथपेस्ट लावलेले बर्नर होते तसेच पुन्हा शेगडीवर ठेवून द्यावे. आणि गॅस पेटवावा. त्यानंतर आपण बघू शकता की, बर्नर मधून गॅस लीक होणे बंद झालेले असेल.
फ्रिजमध्ये भाज्यांचा वास- पदार्थ सांडतात? ‘हे’ भन्नाट कव्हर पाहिले का, आजच विकत आणा...