Lokmat Sakhi >Social Viral > तव्यावर टाका चमचाभर शाम्पू आणि बघा कमाल! तवा होईल नव्यासारखा स्वच्छ - घासण्याची गरज नाही...

तव्यावर टाका चमचाभर शाम्पू आणि बघा कमाल! तवा होईल नव्यासारखा स्वच्छ - घासण्याची गरज नाही...

How To Clean Tawa At Home : Tawa Cleaning Hack : easy tawa cleaning hack : best way to clean tawa : best way to clean tawa with shampoo : शाम्पू वापरून तवा कसा स्वच्छ करता येतो याची खास ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 13:42 IST2025-09-13T13:37:39+5:302025-09-13T13:42:11+5:30

How To Clean Tawa At Home : Tawa Cleaning Hack : easy tawa cleaning hack : best way to clean tawa : best way to clean tawa with shampoo : शाम्पू वापरून तवा कसा स्वच्छ करता येतो याची खास ट्रिक...

How To Clean Tawa At Home Tawa Cleaning Hack easy tawa cleaning hack best way to clean tawa best way to clean tawa with shampoo | तव्यावर टाका चमचाभर शाम्पू आणि बघा कमाल! तवा होईल नव्यासारखा स्वच्छ - घासण्याची गरज नाही...

तव्यावर टाका चमचाभर शाम्पू आणि बघा कमाल! तवा होईल नव्यासारखा स्वच्छ - घासण्याची गरज नाही...

स्वयंपाक घरातील काही अशी भांडी असतात जाच्या वापर आपण हमखास रोज करतोच, तवा हा त्यापैकीच एक. चपाती भाजण्यापासून, अनेक पदार्थ तयार करण्यासाठी तव्याचा वापर केला जातोच. आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाक घरात एक ना अनेक प्रकारचे तवे असतात. ॲल्युमिनियम, लोखंडी, नॉनस्टिक (How To Clean Tawa At Home) असे वेगवेगळ्या प्रकारचे तवे असतात. तवा अगदी दररोजच्या वापरातील असल्याने तो सतत वापरुन कालांतराने खराब होतो. इतकेच (easy tawa cleaning hack) नाही तर, तवा वेळच्यावेळीच स्वच्छ धुतला नाही तर तो अगदी काळाकुट्ट (best way to clean tawa) होतो, त्याच्या कडांवर काळा चिकट - तेलकट थर साचू लागतो. असा काळाकुट्ट - चिकट, तेलकट झालेला तवा तसाच वापरला तर पदार्थ तव्याला चिकटू लागतो तसेच त्यांची चव देखील बिघडू शकते. असा दररोजच्या वापरातील तवा स्वच्छ करणं फारच अवघड होत(best way to clean tawa with shampoo).

दररोजच्या वापरामुळे तव्याचा पृष्ठभाग खराब होतो, अशावेळी तवा व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे असते. खराब झालेला तवा स्वच्छ करण्यासाठी महागडे क्लिनर वापरण्यापेक्षा शाम्पूची एक भन्नाट ट्रिक, तुमचा तवा नव्यासारखा स्वच्छ करू शकतो. तवा कितीही धुतला तरी जुना काळाकुट्ट - चिकट थर निघत नाही पण काळजी करू नका घरातील उपलब्ध कोणताही शाम्पू वापरून तवा अगदी सोप्या पद्धतीने पुन्हा चमकदार करू शकता. भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण नेहमी डिशवॉश वापरतो. पण जर तवा खराब झाला असेल, तर एकदम हटके उपाय म्हणजे शाम्पू. शाम्पूमुळे तवा फक्त स्वच्छच होत नाही तर पदार्थ पुन्हा न चिकटता छान शिजतात. शाम्पू वापरून तवा कसा स्वच्छ करता येतो याची खास ट्रिक पाहूयात... 

शाम्पू वापरून तवा कसा स्वच्छ करता येतो याची खास ट्रिक... 

१. गरम तव्यावर शॅम्पू टाकून तुम्ही त्यावर जमा झालेला जाड थर साफ करू शकता. हा एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे, ज्यामुळे तुमचा तवा अगदी नवीनसारखा चमकेल. शॅम्पू एक सरफॅक्टंट (surfactant) आहे, जो घाण आणि तेलकटपणा काढण्याचे काम करतो. यासाठी तुम्हाला शॅम्पूसोबतच, लिंबाचा रस आणि सालं, चमचाभर मीठ आणि स्क्रबर इतक्या साहित्याची गरज लागेल. 

२. सगळ्यात आधी तवा गॅसवर ठेवून तो चांगला गरम करा. आता, या गरम तव्यावर १ टेबलस्पून शाम्पू आणि एक चमचा मीठ घाला. नंतर, हे दोन्ही एकत्र करून भाजून घ्या. मग, तव्यावर राहू शकेल एवढेच पाणी टाका. त्यानंतर त्यात अर्धा कापलेला लिंबू पिळून त्याचा रस आणि साल दोन्ही तव्यावर टाका. 

कडीपत्त्याच्या रोपाला पानचं येत नाहीत ? ५ घरगुती ट्रिक्स - हिरव्यागार सुगंधी पानांनी भरगच्च बहरेल रोप... 

केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...

३. तव्यावरील मिश्रणातील लिंबाच्या साली काटा चमच्याच्या मदतीने तव्यावर हळूहळू घासा. लिंबू आणि मिठाच्या मिश्रणामुळे तव्यावरची घाण हळूहळू सुटू लागेल. तेव्हा समजा की, तवा साफ झाला आहे.

४. गॅस बंद करून तव्यावर असलेले मिश्रण एका छोट्या वाटीमध्ये काढून घ्या. आता, हेच मिश्रण एका स्क्रबरच्या मदतीने तव्यावर घासून घ्या. अशा प्रकारे, थोड्याच वेळात तवा पूर्णपणे स्वच्छ आणि चकचकीत दिसू लागेल. शेवटी, स्वच्छ पाण्याने तवा धुऊन कोरडा करा. तवा जर लोखंडी असेल तर, त्यावर थोडे तेल लावा, जेणेकरून लोखंडी तव्याला गंज लागणार नाही.

५. तवा गरम असतानाच स्वच्छ करण्याचे कारण असे आहे की, या प्रक्रियेमुळे तो लवकर साफ होतो आणि तुम्हाला तासभर घासत बसण्याची गरज पडत नाही. यामुळे कितीही घाण झालेला तवा अगदी झटपट स्वच्छ होतो.

Web Title: How To Clean Tawa At Home Tawa Cleaning Hack easy tawa cleaning hack best way to clean tawa best way to clean tawa with shampoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.