Join us

तेलाची किटली चिकट - तेलकट झाली ? सोपे ३ उपाय - न घासताच किटली होईल स्वच्छ नव्यासारखी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 17:20 IST

How to Clean Sticky Oily Oil Bottle or Oil Can : how to clean oily oil can : easy way to clean sticky oil container : how to wash sticky greasy oil can at home : रोजच्या वापरातील तेलाची किटली किंवा बाटली खूपच तेलकट - चिकट झाली असेल तर हे घरगुती उपाय करून पाहा...

रोजच्या स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. स्वयंपाक घरात तेल आणि मसाले यांच्या वासाने तेलकट आणि चिकट होणार भांडं म्हणजे तेलाची किटली. रोजच्या कामाच्या घाई - गडबडीत आपण तेलाची छोटी किटली कशीही हाताळतो. अनेकदा तेलाच्या या किटलीतून तेल काढताना तेल किटलीवर सांडते किंवा अनेकदा (How to Clean Sticky Oily Oil Bottle or Oil Can) आपलाच तेलकट हात या किटलीला लागतो. स्वयंपाक घरातील (how to clean oily oil can) तेलाची किटली सततच्या वापराने तेलकट - चिकट होऊन जाते. तेलाची किटली वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ केली नाही तर त्यावर, तेलकट असा थर साचू लागतो. या तेलाच्या चिकट थरावर धूळ - माती किंवा घाण चिकटून किटली अधिकच अस्वच्छ दिसू लागते(easy way to clean sticky oil container).

तेलाची अशी ही चिकट - तेलकट किटली स्वच्छ करणे म्हणजे फार कठीण काम. अनेकवेळा साबण, लिक्विड सोपं किंवा डिटर्जंट वापरूनही त्याचा चिकटपणा पूर्णपणे जात नाही. किटलीवरील तेलाचा चिकट आणि तेलकटपणा घालवण्यासाठी (how to wash sticky greasy oil can at home) किटली अनेकदा घासावी लागते, काहीवेळा फार मेहेनत घेऊन देखील ही किटली पाहिजे तशी स्वच्छ होत नाही. यासाठीच, तेलाची चिकट आणि तेलकट किटली फक्त एका धुण्यात नव्यासारखी स्वच्छ व लखलखीत करण्यासाठी एक खास घरगुती ट्रिक पाहूयात. 

तेलाच्या किटलीवरील चिकट - तेलकटपणा घालवण्याची खास ट्रिक... 

तेलाची चिकट आणि तेलकट किटली फक्त एका धुण्यात स्वच्छ करण्याची खास ट्रिक homecheff_renu या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. तेलाची चिकट - तेलकट किटली स्वच्छ करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी १ टेबलस्पून टूथपेस्ट, बेकिंग सोडा, डिटर्जंट, लिंबाचा रस इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

तव्यावर टाका चमचाभर शाम्पू आणि बघा कमाल! तवा होईल नव्यासारखा स्वच्छ - घासण्याची गरज नाही...    

आता एका वाटीमध्ये टूथपेस्ट घेऊन त्यात  बेकिंग सोडा, डिटर्जंट, लिंबाचा रस घालावा. त्यानंतर एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने हे मिश्रण तेलाच्या किटलीवर लावून घ्यावे. आपण स्वयंपाक घरातील इतरही तेलकट भांडी या पेस्टच्या मदतीने मिनिटभरात स्वच्छ करु शकता. किटलीवर हे मिश्रण ब्रशच्या मदतीने लावल्यानंतर १५ ते २० मिनिटे ते मिश्रण तसेच राहू द्यावे. त्यानंतर त्यावर गरम पाणी ओतून किटली, गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. मग नेहमीप्रमाणे, भांड्यांचा साबण किंवा लिक्विड सोप आणि स्क्रबरच्या मदतीने तेलाची किटली स्वच्छ धुवून घ्यावी. आपण पाहू शकता की, तेलाची किटली नव्यासारखी स्वच्छ दिसू लागेल तसेच त्यावरील चिकट - तेलकटपणा देखील संपूर्णपणे निघालेला दिसेल. 

ना माती, ना कुंडी, ग्लासभर पाण्यात लावा आलं घरच्याघरीच! ताजं औषधी आलं चहात घाला मस्त...

इतरही उपाय येतील कामी... 

१. गव्हाचे पीठ :- आपण तेलाची चिकट - तेलकट किटली गव्हाच्या पिठाच्या मदतीने देखील स्वच्छ करु शकतो. यासाठी सगळ्यात आधी तेलाच्या किटलीवर थोडे गव्हाचे पीठ भुरभुरवून घाला. त्यानंतर हे गव्हाचे पीठ किटलीवर व्यवस्थित चोळून घ्या. गव्हाचे पीठ किटलीवर तेल शोषून घेईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे  साबण किंवा लिक्विड सोप आणि स्क्रबरच्या मदतीने किटली स्वच्छ घासून घ्यावी. 

२. शिजवलेला भात :- किटली स्वच्छ करण्यासाठी आपण शिजवलेला भात देखील वापरू शकता. किटलीवर आपण गरम कडक पाणी ओतून घ्यावे. त्यानंतर शिजवलेला भात थेट किटलीवर लावून चोळून घ्यावा. त्यानंतर त्यावर मीठ घालून पुन्हा एकदा किटली चोळून घ्यावी. मग पाण्याने किटली स्वच्छ धुवून घ्यावी.  त्यानंतर नेहमीप्रमाणे  साबण किंवा लिक्विड सोप आणि स्क्रबरच्या मदतीने किटली स्वच्छ धुवून घ्यावी.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडीकिचन टिप्स